Ajit Pawar : "रामराजे निंबाळकरांना नोटीस पाठवणार..."; अजितदादा संतापले, नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar On Ramraje Nimbalkar : विधान परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, रामराजे नाईक-निंबाळकर यांना नोटीस पाठवणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
Ajit Pawar, Ramraje Nimbalkar
Ajit Pawar, Ramraje NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Baramati News, 06 Nov : विधान परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, रामराजे नाईक-निंबाळकर यांना नोटीस पाठवणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे.

अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीत सहभागी आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक देखील महायुतीतील घटक पक्ष एकत्रित लढवत आहेत.

मात्र, या निवडणुकीच्या प्रचारापासून रामराजे निंबाळकर लांब असल्याचं दिसत आहे. मतदारसंघातील मतभेदामुळे ते प्रचारापासून लांब असल्याच्या चर्चा आहेत. अशातच बुधवारी (ता.6 नोव्हेंबर) अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित केला.

Ajit Pawar, Ramraje Nimbalkar
Eknath Shinde : महाराष्ट्र पिंजून काढत एकनाथ शिंदे प्रचारसभांचा रेकॉर्ड मोडणार; 12 दिवसांचा प्लॅन ठरला

यावेळी पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) हे फलटणच्या किंवा जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात दिसत नाहीत, असा प्रश्न विचारला.

Ajit Pawar, Ramraje Nimbalkar
Devendra Fadnavis: फडणवीसांचे राहुल गांधींवर गंभीर आरोप; लाल संविधानाचे कनेक्शन सांगितले...

या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी ते प्रचारात का दिसत नाहीत याबाबतची नोटीस त्यांना पाठवतो असं उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता अजितदादा त्यांच्या नेत्यावर चांगलेच संतापल्याचं दिसत आहे. शिवाय ते खरंच रामराजेंना नोटीस पाठवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com