Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे नाव बदलणार; आता स्थानकाला मधू दंडवते यांचे नाव

Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकणातील सावंतवाडी रेल्वे स्थानकाबाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Cabinet Decisions on sawantwadi railway station renamed
Maharashtra Cabinet Decisions on sawantwadi railway station renamedsarkarnama
Published on
Updated on

Sawantwadi Railway Station Renamed News : कोकणातील जनतेची अनेक वर्षांची प्रलंबित आणि अत्यंत जिव्हाळ्याची मागणी अखेर राज्य सरकारने मान्य केली आहे. मंगळवारी (ता.२६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यास मंजूरी देण्यात आली आहे. आता ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे स्थानकाचे नाव असेल.

कोकण रेल्वेच्या उभारणीत आणि तळकोकणाच्या विकासात मधु दंडवते यांचे योगदान अतुलनीय होते. त्यामुळे सावंतवाडी स्थानकाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची होती. यासाठी सातत्याने मागणी केली जात होती. दरम्यान आता राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे कोकणवासीयांच्या या मागणीला यश आले असून कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते दिवंगत मधु दंडवते यांच्या सन्मानार्थ नाव बदलण्यात येणार आहे. या नामकरणाचा अधिकृत प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.

Maharashtra Cabinet Decisions on sawantwadi railway station renamed
Cabinet decisions : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मोठे पाऊल; मंत्रिमंडळ बैठकीतील 4 महत्त्वपूर्ण निर्णय!

दरम्यान राज्य सरकारने इतर तीन महत्वाचे निर्णय घेतले असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारने 'महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005' या कायद्यात बदल केला आहे. यामुळे आता शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तसेच ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात असणाऱ्या डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा येथील प्रसिद्ध पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला हक्काची जमीन देण्यात आली आहे. उद्योग विभागाने मंदिर ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Cabinet Decisions on sawantwadi railway station renamed
Cabinet Decisions : नोकर भरतीसाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल, 8 हजार पेक्षा जास्त पदांना मान्यता

त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील पायाभूत सुविधांना गती देत 'नवीन नागपूर' व 'नवीन बाह्य वळण रस्ता' प्रकल्पासाठी मुद्रांक शुल्क माफ (Stamp Duty)करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com