Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ई-केवायसी, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा लाभ अन् पती, वडील नसलेल्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana eKYC : लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्यापासूनचा हप्ता मिळालेला नाहीये. तसेच ईकेवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबरपर्यंत असून शेवटची मुदतही संपण्यास अवघे दोनच दिवस उरले आहेत.
 Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on
Summary
  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सुमारे ४५ लाख महिलांचे ई-केवायसी अद्याप अपूर्ण आहे.

  • त्यामुळे सरकारने ई-केवायसीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी स्वतंत्र माहिती संकलनासाठी विशेष संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्यापासूनचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. त्यातच आता ई-केवायसीची मुदतही ३१ डिसेंबरला संपणार आहे. तर अजूनही सुमारे ४५ लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. पण ही चिंता आता राज्य सरकारने दूर केली असून ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे. तसेच पती-वडील दोन्हीही नसलेल्या लाभार्थींसाठी देखील मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील महायुती सरकारला पुन्हा सत्तेत बसवणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाखो महिलांना ई-केवायसी करण्याची शेवटची संधी सरकारने दिली आहे. ती ३१ डिसेंबरपर्यंत असून अद्याप सुमारे ४५ लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे या प्रक्रियेसाठी आणखी एक दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. यामुळे आता राज्य सरकारकडून लाडक्या बहि‍णींसाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. तसेच पती-वडील दोन्हीही नसलेल्या लाभार्थींची माहिती स्वतंत्रपणे संकलित केली जाणार असून त्यासाठी संकेतस्थळ तयार करण्यात आल्याचेही माहिती मिळत आहे.

योजना सुरू झाल्यानंतर राज्यभर एक कोटी ५६ लाख महिला लाभार्थी ठरल्या होत्या. पण आता विविध निकषांच्या आधारे यात काट छाट करण्यात आली असून तब्बल ४६ लाख महिलांचा लाभ शासनाने बंद केला आहे. या महिला अपात्र ठरल्या आहेत. आता एक कोटी दहा लाखांपर्यंतच लाभार्थी असून यांना देखील राज्य शासनाने ‘ई-केवायसी’ बंधनकारक केले असून लाभार्थी व त्यांच्या कुटुंबप्रमुखाचे आधारलिंक केले जात आहे. या निकषांतून महिला लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी केली जात आहे.

 Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : बहिणींनो, आनंदाची बातमी! निवडणूक जिंकली, आता शब्द पाळणार लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांबाबत शिंदेंचा मोठा खुलासा!

यामुळे ज्या महिला लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल त्यांचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. दरम्यान आता ई-केवायसीची मुदतही ३१ डिसेंबरला संपणार असून उर्वरीत दोन दिवसांत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावीच लागणार आहे. ती जर नाही केली आणि मुदतवाढ न मिळाल्यास १ एप्रिलनंतर ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींनींचा लाभ बंद होऊ शकतो.

आचारसंहितेचा अडथळा

राज्यातील पात्र ठरलेल्या तब्बल एक कोटी दहा लाख लाभार्थी लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील असा दोन महिन्यांचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे महिला चिंतेत आल्या आहेत. यामागे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहितेचा अडथळा असल्याचे कारण दिसत आहे. तर आचारसंहितेमुळेच दोन महिन्यांच्या लाभाचे वितरण झाले नसावे अशीही शक्यता व्यक्त केली जातेय. तसेच कदाचित ई-केवायसीची मुदत संपताच पुढील महिन्यात एकाच वेळी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा लाभ किंवा जानेवारी सह तीन महिन्यांचा एकत्रितपणे असा ४५०० रूपयांचा लाभ मिळू शकतो.

 Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : 1500 नाही, आता थेट 4500! लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी 3 हप्त्यांची लॉटरी?

FAQs :

Q1. लाडकी बहीण योजनेचे ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख कोणती?
👉 आता ई-केवायसीसाठी अंतिम तारीख ३१ जानेवारी आहे.

Q2. किती महिलांचे ई-केवायसी अजून बाकी आहे?
👉 सुमारे ४५ लाख महिलांचे ई-केवायसी प्रलंबित आहे.

Q3. ई-केवायसी न केल्यास काय होईल?
👉 लाभ थांबण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

Q4. पती किंवा वडील नसलेल्या महिलांसाठी काय व्यवस्था आहे?
👉 अशा लाभार्थींसाठी स्वतंत्र माहिती संकलनासाठी विशेष पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

Q5. ई-केवायसी कुठे आणि कसे करता येईल?
👉 अधिकृत सरकारी पोर्टल किंवा जवळच्या सेवा केंद्रावर ई-केवायसी करता येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com