Bhaskar Jadhav : 'रामदास कदमांची आता उलटी गिनती सुरू', शस्त्र परवाना प्रकरणावरून उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने डागली तोफ

Maharashtra politics heats up over the gun license controversy : राज्यात सध्या पळून गेलेल्या गँगस्टर नीलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळला दिलेल्या शस्त्र परवाना प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापलं आहे.
Ramdas Kadam and Yogesh Kadam
Ramdas Kadam and Yogesh KadamSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सचिन घायवळला दिलेल्या शस्त्र परवान्यावरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे.

  2. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर थेट टीका करत "उलटी गिनती सुरू झालीय" असे वक्तव्य केले.

  3. या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या गोटात वाद आणि चर्चा अधिकच तीव्र झाली आहे.

Ratnagiri News : राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गँगस्टर नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळला दिलेल्या शस्त्र परवान्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. या प्रकरणावरून योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. तर त्यांच्या बचावाला वडील रामदास कदम मैदानात उतरले आहेत. रामदास कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवरही टीका केलीय. या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदमांवर पलटवार करताना, रामदास कदमांची आता उलटी गिनती सुरू झाल्याचे म्हटलं आहे.

गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्र्यांनी शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर उघड झाली होती. यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला ही आयती संधी चालून आली. त्यानंतर खासदार संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांनी कदम यांच्यावर जोरदार टीका केली.

आमदार अनिल परब यांनी कदम यांच्यावर आपण अनेकदा आरोप केले असून त्याचे पुरावेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत. त्यातच आता एका गुंडाचे रिवॉल्वरचे लायसेन्स देण्याचा प्रकार कदम यांच्यांकडून घडला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी कदम यांना पाठिशी न घालता सरकारमधून त्यांची सरकारमधून हकालपट्टी करावी, असे मागणी केली होती.

Ramdas Kadam and Yogesh Kadam
Bhaskar Jadhav : ‘छमछमदास, बामदास, भडवेगिरी करणारा, श्वान....’ भास्कर जाधवांकडून रामदास कदमांवर हल्लाबोल

या मागणीनंतर अनिल परब यांच्यावर रामदास कदम यांनी जोरदार प्रहार करत उलट प्रश्न केले होते. तसेच थेट एकरे उल्लेख देखील करत गृहराज्यमंत्री निर्णय घेताना तो काय तुला विचारून निर्णय घेणार का? असाही सवाल केला होता. तसेच या प्रकरणात विधिमंडळातील एका मोठ्या पदावर बसलेल्या, मंत्र्यांना देखील आदेश देणाऱ्या अशा व्यक्तीने सांगितल्यानंतरच योगेश कदम यांनी निर्णय घेतल्याचे सांगितले.

असे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच याप्रकरणात आमदार भास्कर जाधव यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी रामदास कदमांवर जोरदार टीका केली करताना, रामदास कदमांची उलटी गिनती सुरू झालीय, असे म्हटले आहे. भास्कर जाधव यांनी आरोप केला आहे की, पोलिसांनी एका गुंडाचे रिवॉल्वरचे लायसेन्स नाकारल्यानंतरही, योगेश कदमांनी गृहराज्यमंत्री म्हणून आपल्या विशेष अधिकारांचा गैर वापर केला. त्या गुंडाला परवाना दिला.

या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मला असं वाटतं कि रामदास कदमांची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे, असे भास्कर जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान या प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांच्या अधिकारांच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या नकारात्मक अहवालाकडे दुर्लक्ष करून परवाना देण्यात आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून तीव्र संघर्ष सुरू झाला आहे.

Ramdas Kadam and Yogesh Kadam
Bhaskar Jadhav : दापोलीचं कृषी विद्यापीठ भास्कर जाधवांच्या रडारवर; अधिवेशन गाजवण्यासाठी पहिला मुद्दा मिळाला

FAQs :

प्र.1: सचिन घायवळ प्रकरण काय आहे?
👉 गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

प्र.2: भास्कर जाधव यांनी कोणावर टीका केली?
👉 त्यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

प्र.3: भास्कर जाधव यांनी काय म्हटलं?
👉 त्यांनी म्हटलं की, “रामदास कदमांची उलटी गिनती सुरू झालीय.”

प्र.4: या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया कशा आल्या?
👉 या वक्तव्यानंतर शिवसेनेत आणि महायुतीत चर्चा आणि खळबळ माजली आहे.

प्र.5: घायवळ प्रकरणामुळे कोणाला अडचण येऊ शकते?
👉 गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि त्यांच्या समर्थकांना या प्रकरणामुळे राजकीय अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com