सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा (Sindhudurg District Bank Election) बँक निवडणुकीच्या मत मोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या पॅनलचे प्रमुख सतिश सावंत पराभूत झाले आहेत. सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समान मते पडली होती.
त्यानंतर चिठ्ठी टाकण्यात आली त्यामध्ये सतिश सावंत यांना पराभवचा धक्का बसला. तर विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. मनिष दळवी वेंगुर्लामधून विजयी झाले आहेत. भाजपला ४ जागा आणि महाविकास आघाडीला आता पर्यंत ४ जागा मिळाल्या आहेत. भाजपचे (BJP) सिद्धिविनायक पॅनेलच आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सहकार समृद्धी पॅनेल यांच्यात ही निवडणूक होत आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणुकीसाठी आठही तालुका तहसील कार्यालयात मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. मतदानासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन्ही बाजूकडून निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही पॅनेलने तगडे उमेदवार देत एकमेकांसमोर तगडे आवाहन उभे केले आहे. मतमोजणी केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणामुळे ही निवडणूक जास्तच चेर्चेत आली होती.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 19 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत 39 दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. 981 मतदारांपैकी 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे 98.76 टक्के मतदान झाले आहे. ३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. बँकेचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनलचे प्रमुख सतीश सावंत मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत. थोड्यात वेळात पहिला कल हाती येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.