Municipal Election : तब्बल 10 वर्षांनंतर चिपळूणमध्ये निवडणुकीचा थरार! भाजप विरुद्ध शिवसेना लढत? उमेदवार शोधण्यासाठी नेतेही मैदानात

Mahayuti Vs MVA : आगामी नगरपालिकेची निवडणूक जानेवारी ते फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. महायुती व महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Chiplun Municipal Mayor Election
Chiplun Municipal Mayor Electionsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. तब्बल दहा वर्षांनंतर होणाऱ्या चिपळूण नगरपालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

  2. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि भाजपचा थेट सामना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  3. यामुळे चिपळूणमधील राजकारण आतापासूनच तापले आहे.

Chiplun News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून महायुती व महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू झाला आहे. सिंधुदुर्गमध्ये भाजपने दिलेल्या स्वबळाच्या घोषणेचे पडसाद आता रत्नागिरीत उमटण्याची शक्यता असतानाच आगामी नगरपालिकेची निवडणुकीसाठी पक्षांनी कंबर कसली आहे. तब्बल दहा वर्षांनंतर होणाऱ्या चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात तगडे उमेदवार उतरवण्यासाठी सर्व पक्ष तयारी करताना दिसत आहेत.

नगरपालिकेची निवडणूक जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. यासाठी 14 प्रभागांतून 28 उमेदवार निवडले जाणार आहेत. दरम्यान ही निवडणूक एकत्रित लढवायची की, स्वबळावर याचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. महायुतीत सध्या जागावाटपाची कोणतीच बोलणी झालेली नाही. तर महाविकास आघाडीत अद्यार जागावाटपाची चर्चाच नाही. मात्र आप, मनसे आणि इतर छोट्या पक्षांनीही या निवडणुकीसाठी हालचाल सुरू केली आहे.

एका प्रभागात 15 हून अधिक उमेदवार इच्छुक असले तरीही उमेदवाराची आर्थिक व सामाजिक ताकद पाहूनच चेहरे निवडले जाणार आहेत. त्यामुळे भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा कस लागणार आहे.

Chiplun Municipal Mayor Election
Buldhana Municipal Election: निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; सर्व जागा लढणार

पालिकेच्या 14ही प्रभागांमध्ये आपल्या पक्षातून कितीजण इच्छुक आहेत, याची चाचपणी सध्या नेत्यांनी सुरू केली आहे. भाजपकडे 65 तर काँग्रेसकडे 25 उमेदवारांची यादी तयार आहे. इतर पक्षांनी अजून मुलाखतीचा कार्यक्रम हाती घेतलेला नाही.

सध्या प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार निवडण्यासाठी चाचपणी सुरू आहे. कार्यकर्त्यांनी केंद्रनिहाय वेगवेगळ्या पातळीवर कामही सुरू केले आहे. निवडणुकीसाठी सर्व प्रभागांमध्ये आमची तयारी पूर्ण झाली आहे. महायुती म्हणून ही निवडणूक आम्ही लढवणार असल्याची प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेचे चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी दिली आहे.

तर काँग्रेसचे चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी, महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढवणार आहोत. या निवडणुकीत आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, अशी मागणी आम्ही काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत वरिष्ठांकडे केली आहे. आमच्याकडे निवडणुकीत उभे करण्यासाठी प्रभावी उमेदवार असल्याचे म्हटले आहे. यामुळे आगामी चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधीच येथील राजकीय वातावरण आता तापण्यास सुरूवात झाली आहे.

Chiplun Municipal Mayor Election
Bhor Municipal Election : भोर नगरपालिका निवडणुकीत नवे राजकीय समीकरण! इच्छुक उमेदवारांच्या पक्ष बदलाच्या हालचालींना वेग

FAQs :

1. चिपळूण नगरपालिका निवडणूक किती वर्षांनंतर होत आहे?
तब्बल दहा वर्षांनंतर ही निवडणूक होत आहे.

2. या निवडणुकीत कोणता थेट सामना अपेक्षित आहे?
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट सामना होण्याची शक्यता आहे.

3. महाविकास आघाडीची भूमिका काय आहे?
महाविकास आघाडीने देखील उमेदवार निवड आणि संघटनाची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

4. महायुतीत तणावाचे कारण काय आहे?
शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोन्ही पक्षांतील जागा वाटपावर मतभेद आहेत.

5. या निवडणुकीला काय विशेष महत्त्व आहे?
चिपळूण निवडणूक ही स्थानिक पातळीवर महायुतीच्या एकीचे आणि जनाधाराचे परीक्षण ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com