Konkan Politics: दापोली नगरपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाला दणका; महायुतीचे वर्चस्व

Dapoli Nagar Panchyat News : दापोली नगरपंचायतीच्या विशेष समितीच्या निवडणुकीत आता थेट सत्ताबदलाचे संकेत मिळाले असून...
Dapoli Nagar Panchyat News
Dapoli Nagar Panchyat News Sarkarnama
Published on
Updated on

Dapoli News : दापोली नगरपंचायतीच्या विशेष समितीच्या निवडणुकीत आता थेट सत्ता बदलाचे संकेत मिळाले असून अजितदादांची राष्ट्रवादी व ठाकरे गट यांच्यात आता फूट पडल्याचे जवळपास स्पष्ट झाल आहे. त्यामुळे ठाकरे गटाला विषय समित्यांवरील आपले वर्चस्व गमवाव लागल आहे. त्यामुळे तूर्तास तरी आता आमदार योगेश कदम राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे या दोन्ही पक्षांमध्ये गोडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दापोली नगरमंचायतीच्या विषय समित्यांच्या बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गडाकडे एक समिती आली असून भाजपाच्या नगरसेविका जया साळवी यांना तीन समित्यांमध्ये सदस्यपद मिळाल आहे. आज झालेला विशेष समित्यांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे सहाही नगरसेवक अनुपस्थित राहिले आहेत. मात्र अद्याप राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे उपनगराध्यक्ष पद कायम आहे.

Dapoli Nagar Panchyat News
Maharashtra Politics : भुजबळांच्या कट्टर समर्थकाची मोठी घोषणा; महाराष्ट्रात आणखी एका राजकीय पक्षाची एन्ट्री

ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांच्यासह सहाही नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने विषय समित्यांवरील आपलं वर्चस्व ठाकरे गटाने गमावल आहे. त्यामुळे दापोली नगरपंचायतीत नगराध्यक्षपद ठाकरे गटाकडे असलं तरी सुद्धा राज्यातील सत्ताबदलाचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे ऐन 'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशीच दापोली नगरपंचायतीच्या सत्ताकरणात शिवसेनेच्या ठाकरे गटाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि शिवसेनेचे शिंदे गटाने दणका दिला आहे.

दापोली नगरपंचायमध्ये महिला बालकल्याण समिती ही शिवसेनेच्या शिंदे गटाचे नगरसेवक कृपा घाग यांच्याकडे आली असून त्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती झाल्या आहेत.तर उर्वरित तीन समित्या या अजितदादांच्या राष्ट्रवादी गटाकडे राहिल्या आहेत. तर भाजपच्या (BJP) नगरसेविका जया साळवी यांना सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा स्वच्छता व आरोग्य तसेच महिला बालकल्याण समितीचे सदस्यपद मिळाल आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दुसऱ्या नगरसेविका प्रीती शिर्के यांनाही तीन समितीचे सदस्यपद मिळाल आहे. त्यामुळे आजवर नगरपंचायतीमधील सत्ता करणापासून बाजूला असलेल्या शिंदे गटाच्या दोन नगरसेविका व भाजपाच्या नगरसेविका यांना विषय समित्यांमध्ये स्थान मिळाल आहे. या निवडणुकीसाठी दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Dapoli Nagar Panchyat News
Maharashtra Politics : भुजबळांच्या कट्टर समर्थकाची मोठी घोषणा; महाराष्ट्रात आणखी एका राजकीय पक्षाची एन्ट्री

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com