Mumbai News: महाराष्ट्राच्या राजकारणात आता आणखी एका राजकीय पक्षाची एन्ट्री झाली आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आज नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. 'ओबीसी बहुजन पार्टी' असं शेंडगे यांनी जाहीर केलेल्या पक्षाचे नाव आहे. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी आणि ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आपण हा नवा पक्ष स्थापन करत असल्याचं शेंडगेंनी यावेळी सांगितलं. (OBC leader Prakash Shendge)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर जरांगे पाटील यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. यासंदर्भात ओबीसी नेत्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी मोठमोठ्या सभा आणि मेळावे देखील घेतले. यानंतर आता प्रकाश शेंडगे यांनी थेट 'ओबीसी बहुजन पार्टी'ची घोषणा केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रकाश शेंडगे यांच्या 'ओबीसी बहुजन पार्टी'चा झेंडा हा पिवळ्या रंगाचा असणार आहे. तर चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असं असेल, अशी माहिती सांगण्यात आली आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांनी आपली पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. यातच आता नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री झाल्यामुळे आगामी निवडणुकीत आणखी चुरस पाहायला मिळणार आहे.
"ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. आपल्या पक्षाचा झेंडा पिवळ्या रंगाचा आहे. 'ओबीसी बहुजन पार्टी' ही आगामी लोकसभेच्या 48 जागा लढवणार असल्याची घोषणा करत 10 ते 12 जागा जवळपास फायनल झाल्या असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी यावेळी सांगितले.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.