Shivsena Politics : शिवसेनेकडून आयात उमेदवार राज्यसभेवर; देवरांचा शिवसेनाप्रवेश ही भाजपची स्क्रिप्ट?

Rajyasabha Election : देवरांना राज्यसभेची संधी दिल्याने शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीची बीजे?
Eknath Shinde, Milind Deora
Eknath Shinde, Milind DeoraSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News :

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून (शिंदे) माजी खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मिलिंद देवरा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उमेदवारी दिली असली तरी त्यात त्यांचा नेमका फायदा काय आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचवेळी देवरांना राज्यसभेची संधी ही भाजपची स्क्रिप्ट मानली जाते.

Eknath Shinde, Milind Deora
Ashok Chavan News : भाजपचं आधीच ठरलं होतं! म्हणून चव्हाणांचा पक्षप्रवेश तातडीनं

उमेदवार शिंदेंचा... डाव भाजपचा

राज्यसभेसाठी (Rajyasabha) भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेने नावे जाहीर केली आहेत. शिंदे यांनी नुकतेच काँग्रेसमधून प्रवेश केलेले माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांना संधी दिली. मात्र यामध्ये शिवसेनेचा नेमका फायदा तरी काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मिलिंद देवरा यांनी गेल्या महिन्यात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये राहून त्यांना उमेदवारी मिळाली नसती, असा दावा मिलिंद देवरांनी केला होता.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जून 2022 मध्ये बंड केले. त्यांना 40 आमदार आणि 12 खासदारांनी साथ दिली. शिंदेंसोबत गेल्यावर संधी मिळेल असे अनेक नेत्यांना वाटले होते. आधी कॅबिनेट मंत्रिपद मिळेल अशी आशा अनेकांना होती, तर दुसरीकडे काहींना राज्यसभेवर संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु सुरुवातीलाच आयात उमेदवाराला राज्यसभेवर पाठवल्याने शिंदेंच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

सुरुवातील मिलिंद देवरा भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याची चर्चा होती. मिलिंद देवरांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी देण्याची चर्चा होती. मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना आता राज्यसभेची संधी देण्यात आली आहे. या मागे देखील भाजपचा हात आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना सांगून मिलिंद देवरा यांचं नाव सुचवा, असं सांगितल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदेंची शिवसेना वाढणार कशी?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) अजूनही इन्कमिंग सुरू आहे. त्यांचा मुख्य उदेश पक्ष वाढवण्याचा आहे. पण शिवसेनेतील जुन्या चेहऱ्यांना संधी मिळत नसेल तर मग पक्ष वाढणार कसा? या कृतीमुळे जुन्या चेहऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतील.

शिवसेनेतील नेते कमळावर निवडणूक लढवणार?

वेळ आल्यास हातात कमळ घेऊन निवडणूक लढवू, असे विधान शिवसेनेच्या काही नेत्यांनी केले होते. तशी वेळ लोकसभा निवडणुकीत येऊ शकते. शिवसेनेच्या नेत्यांना जर उमेदवारी नाकारली गेली तर ते भाजपमधूनही निवडणूक लढवण्यास कमी करणार नाहीत, असेही आता बोलले जाते.

(Edited by Avinash Chandane)

Eknath Shinde, Milind Deora
BJP Rajya Sabha Election: चव्हाणांच्या 'एन्ट्री'नंतर भाजपने 'मोहरे'च बदलले; राणेंचा राज्यसभेला पत्ता कट ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com