Ajit Pawar NCP Controversy : राष्ट्रवादीत नवा ‘देव’ तयार होतोय? अमोल मिटकरींचा भन्नाट टोला

Amol Mitkari takes a dig after Ajit Pawar and Sunetra Pawar photos were missing from a banner at Sunil Tatkare Raigad event : रायगडमधील अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमाच्या बॅनरवर दिवंगत नेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो न वापरल्यावरून राजकीय वाद पेटला आहे.
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

Sunil Tatkare Raigad event : रायगडमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील अजित पवार राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांच्या सत्कार सोहळ्यातील बॅनरवरून चांगलाच राजकीय वाद उफळला आहे.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाच्या बॅनरवर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्ष नेत्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोटो न वापरण्यावरून, तटकरे यांच्याभोवती वाद निर्माण झाला आहे. पक्षाचे अमोल मिटकरी यांनी, 'राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वत:देव बनण्याचा कुणी प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही,' असा सूचक म्हटलं आहे.

अजित पवार राष्ट्रवादीचे (NCP) अमोल मिटकरी यांनी, त्यांच्या एक्स खात्यावर शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, “ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय. हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वत: देव बनण्याचा कुणी प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही.”

खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. या कार्यक्रमाला त्यांची मुलगी मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे देखील उपस्थित होते. कार्यक्रमासाठी लावलेला पोस्टरवर तटकरे कुटुंबीयांचे फोटो होते. परंतु दिवंगत नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांचे फोटो नव्हते.

Amol Mitkari
NCP Political Clash : अंगठ्यापासून बुवाबाबांपर्यंत राजकारण तापलं; तटकरे अन् परांजपेंवर 'तुमचे गंडेदोरे, तुमचे बुवा' लवांडेंचा जोरदार वार

मिटकरींच्या पोस्टमध्ये पवार कुटुंबीय

तटकरे कुटुंबीयांच्या या भूमिकेवर अजित पवार राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी सुरवातीला संताप व्यक्त केला. यानंतर आता अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत तटकरेंना सूचक, असा इशारा दिला आहे. अमोल मिटकरी यांनी पोस्टबोरबर अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांचा एकत्रित फोटो देखील शेअर केला आहे.

Amol Mitkari
Parth Pawar birthday : “प्रिय पार्थ…” दादांच्या अनुपस्थितीत वाढदिवस; तटकरेंनी उलगडला वारशाचा मुद्दा, दिल्लीसह पक्ष संघटनेत जबाबदारीचे संकेत?

तटकरेंच्या प्रतिक्रियेकडे लक्ष

सुनील तटकरेंच्या या कृतीमुळे पक्षातंर्गत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे. अगोदर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षावर ताबा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहेत. त्यात तटकरे यांनी केलेली ही कृती, त्याला बळ देणारी असल्याची चर्चा आहे. यावर सुनील तटकरे यांच्याकडून अजून प्रतिक्रिया समोर आलेली नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी तटकरेंना डिवचलं आहे.

ओबीसी-मराठा वाद वाढवला

अजितदादांचा पक्ष ताब्यात घेण्याचे, आधीपासूनचेच मनसुबे लपवून राहिलेले नाहीत. त्याची सुरुवात रायगडपासून झाली आहे. आदरणीय अजितदादांचा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनींचा पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात बॅनरवर नाव किंवा फोटो सुद्धा नाही. याला कृतघ्नता म्हणतात. अजितदादांनी यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर अनेक वर्षे ठेवल्यामुळे यांची राज्यपातळीवर प्रतिष्ठा वाढली. यांनी पक्षांतर्गत ओबीसी-मराठा, असा जातीयवाद सुद्धा वाढवलेला, जे अजितदादांना पटत नव्हते, असे विलास लवांडे यांनी म्हटलं आहे.

तटकरेंनी पटलेंनाबरोबर पक्ष काढावा

सुनील तटकरे तुमच्यात हिंमत असेल, तर स्वतःचा पक्ष प्रफुल पटेल यांना सोबत घेऊन काढावा. किंवा भाजपमध्ये जाण्यासाठी तुम्ही आधीपासूनच तयार आहात, तर तुमची चार चौकडी घेऊन तुम्ही जावे. तुमच्या कृतघ्नतेचा तीव्र निषेध! असे प्रवक्ते लवांडे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com