Raigad Politics : शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष चिघळला : शिंदेंचा आमदार भडकताच तटकरे आक्रमक; ‘आता जशास तसं उत्तर’

Aniket Tatkare Mahendra Dalvi political controversy : रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली असून वाद होताना दिसत आहेत.
Raigad Political Controversy; Sunil Tatkare, Eknath Shinde, Aniket Tatkare And Mahendra Dalvi
Raigad Political Controversy; Sunil Tatkare, Eknath Shinde, Aniket Tatkare And Mahendra Dalvi Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad Political News : कोकणातील रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय आखाडा तयार होताना दिसत असून तटकरे-विरूद्ध शिवसेना असा वाद पेटला आहे. याआधी मंत्री भरत गोगावले विरूद्ध राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असा वाद होता. पण आता आमदार महेंद्र दळवी विरूद्ध तटकरे असा सामना रंगला आहे.

नुकताच दळवींनी आमच्या कामाचे श्रेय तटकरे घेतात, ते आम्हाला उद्घाटनालाही बोलवत नाहीत असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती. तसेच तटकरे यांनी थोडं सबुरीने घ्यावं असा सल्ला दिला होता. या टीकेवर आता आमदार अनिकेत तटकरे यांनी पलटवार केला आहे. त्यांनी आमचं काम हे हाथी चले बाजार ..... या पद्धतीने सुरू असतं, असे म्हणत यापुढे टीका झाली तर जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशाराही तटकरे यांनी दिला आहे. या आरोप- प्रत्यारोपामुळे पुन्हा एकदा रायगडचे राजकारण तापले आहे.

रायगडमधील विकासकामांच्या श्रेयावरून पुन्हा एकदा शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली आहे. रोह्यातील एका मुस्लिम बहूल भागातील शाळेच्या दुरुस्तीच्या कामावरून हा वाद रंगला आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी यावरूनच खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Raigad Political Controversy; Sunil Tatkare, Eknath Shinde, Aniket Tatkare And Mahendra Dalvi
Raigad Politics : रायगडच्या राजकारणात तटकरेचं वजन वाढलं? गोगावलेंनी आपल्याच शिलेदारांना एकटं पाडलं

दळवी म्हणाले की, मी माझ्या मतदार संघातील मुस्लिम बहूल भागातील एका शाळेच्या दुरुस्तीच्या कामासाठी निधी दिला होता. पण काल खासदार तटकरे यांनी त्या कामाचं उद्घाटन केलं. पण नियमाप्रमाणे त्यांनी निमंत्रण पत्रिका काढून आम्हा सर्वांना तेथे बोलवायला हवं होतं. पण ते खासदार आहेत. त्यांच्या नियमीच्या सवयी प्रमाणे त्यांनी तसे केलं नाही. त्यांनी आमच्या कामाचं श्रेय घेतलं.

यामुळे आता पुन्हा एखदा दुसऱ्यांदा त्यांना सबुरीचा सल्ला देत आहे की त्यांना नेहमीच घाई झालेले असते. यामुळेच ते सदा घाई घाईत निर्णय घेत असतात. दरम्यान रोह्यात एका कार्यक्रमात त्यांनी पालकमंत्र्यांचे नावच घेतलं नाही. ते आमचं कुटुंबच म्हणजे प्रतिनिधी असे ते दाखवण्याचे काम करतात.

पण लोक आता खूप शहाणी असून ज्ञानी आहेत. ते पुढे नक्कीच विचार करतील. तटकरेंना खूपच घाई असते. पण सतत घाईची निराशाच होते, असे मला वाटते. यामुळे त्यांनी घाई करू नये, सबुरी ठेवावी. ज्यांनी निधी आणला त्यांना तरी कळवावे. एकाच कामावर दोन दोन तीन तीनदा निधी टाकणे हे देखील योग्य नाही असेही त्यांनी म्हणत दळवींनी तटकरेंना डिवचलं आहे. CSR निधीवरून देखील दळवींनी तटकरेंवर हल्लाबोल केला असून जिल्ह्यातील CSR निधी फक्त रोह्यातच का वापरला जातो असाही सवाल दळवींना यावेळी तटकरेंना उद्देशून केला आहे.

दरम्यान रोह्यातील युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अनिकेत तटकरे यांनी दळवींचा आरोपाचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी आमदार महेंद्र दळवींनी आमच्यावर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षी विकास कामांना द्या असा सल्ला दिला आहे. तसेच यापुढे पुन्हा टीका केल्यास जशास तसे उत्तर देऊ असाही इशारा त्यांनी दिला आहे.

अशा आणाभाका मारणारे निवडणुका आल्यावर तीच माणसं तीच व्यक्ती मात्र तटकरे साहेबांच्या पायाशी येते आणि निवडणूक संपल्या, मतदानाची शेवटची वेळ ५.३० वाजून गेले की मग कोण तटकरे असं विचारू लागतात. यामुळे एक जर आमची ताकद या मतदार संघात नाहीच तर आमच्यावर वारंवार टीका करण्यासाठी वेळ का घालवता. तीच वेळ लोकांच्या कामांसाठी भागातील लोकांसाठी वापरा, लोकांना न्याय द्या. आमच्यावर वेळ घालवता. यानंतर पत्रकार त्यावर प्रश्न विचारतात.

Raigad Political Controversy; Sunil Tatkare, Eknath Shinde, Aniket Tatkare And Mahendra Dalvi
Raigad Politics : संयमी पवित्रा घेणाऱ्या तटकरेंनी नाव न घेता शिंदेंच्या शिलेदाराला डागली तोफ, 'काय बोलू नये...'

पण आता आम्हाला काहीच वाटतं नाही. कोणाला जे काही बोलायचं असेल ते बोलावं. कारण तटकरेंनी गेल्या ४० वर्षात इतकी टीका सहन केली आहे. यामुळे आम्ही आमचं काम हे हाथी चले बाजार.... बाकी पुढचं बोलत नाही. आम्ही तटकरेंचे कार्यकर्ते म्हणून आमचं काम करत राहू. पण जर असे कोणी वारंवार तटकरेंवर टीका करत असेल तर त्याला जशास तसं उत्तर देऊ’ हा इशारा असल्याचेही म्हणत अनिकेत तटकरे यांनी दळवींना दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com