Malvan Sting operation : निलेश राणेंच्या स्टिंगनंतर भाजप एकवटली : रविंद्र चव्हाण, बावनकुळेंची समज, नितेश राणेंचाही सल्ला

Ravindra Chavhan, Nitesh Rane And Chandrashekhar Bawankule on Nilesh rane Sting operation : शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी स्टिंग ऑपरेशन करून थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
Malvan Sting operation; Nilesh rane, Chandrashekhar Bawankule, Nitesh Rane And Ravindra Chavhan
Malvan Sting operation; Nilesh rane, Chandrashekhar Bawankule, Nitesh Rane And Ravindra Chavhansarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रोकड भरलेली बॅग सापडल्याचा दावा करत त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले.

  2. या आरोपांवर रवींद्र चव्हाण, नितेश राणे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला.

  3. या घडामोडीनंतर मालवण नगरपालिका निवडणूक अत्यंत स्फोटक आणि ताणतणावपूर्ण झाली आहे.

Sindhudurg News : राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या रणधुमाळीच्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पालिका निवडणुकीत हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मालवणमधील भाजप नेते विजय केनवडेकर यांच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. यावेळी तालुका अध्यक्ष बंड्या सावंत आणि काही पदाधिकारीही तेथे उपस्थित होते. तसेच पैशांनी भरलेली एक बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली. या स्टिंग ऑपरेशनवरून आता महायुतीत "भूकंप" येण्याचे संकेत खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले असून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि निलेश राणे यांचे भाऊ, मंत्री नितेश राणे यांनीही बोचरी टीका केली आहे.

निलेश राणे यांनी केलेल्या या धडक कारवाईनंतर आता महायुतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावरून कालच भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पक्षाची बाजू मांडली होती. तर आज रवींद्र चव्हाण, भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री नितेश राणे यांनी या मुद्द्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

यानंतर रवींद्र चव्हाण यांनीही राणे यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून आणले, त्यांच्या घरी जाऊन अशी कृती करणे चुकीचे आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच ते असे आरोप करत आहेत. याची सुरुवात ही भाजप-शिवसेना युती का झाली नाही, येथूनच झाली आहे. त्यानंतर या गोष्टी वाढत गेल्या. पण ज्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं, त्यांच्याच घरी जाऊन अशा प्रकारची कृती करणं चुकीचं आहे.”

ते पुढे म्हणाले, “कोणत्याही कार्यकर्त्याला व्यावसायिक म्हणून काम करण्याचा अधिकार नाही का? की फक्त नेत्यांनाच व्यवसाय करण्याचा अधिकार आहे? ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आता पोलिस आणि निवडणूक आयोगच याचा तपास करतील.”

Malvan Sting operation; Nilesh rane, Chandrashekhar Bawankule, Nitesh Rane And Ravindra Chavhan
Nilesh Rane : रवींद्र चव्हाण आले म्हणजे पैशांचे बॅगा आल्या... स्टिंग ऑपरेशनंतर निलेश राणे थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवरच तुटून पडले

तसेच त्यांनी नाराजी व्यक्त करत, “आम्हाला फक्त २ तारखेपर्यंत युती टिकवायची होती,” असेही म्हटले. या स्टिंग ऑपरेशनमुळे मालवणमधील निवडणूक अत्यंत संवेदनशील वळणावर आली असून याचे परिणाम राज्यभर उमटण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि भाजपमधील संघर्षही टोकाला जाऊ शकतो.

दरम्यान, या वादात भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना विचारले, “एखाद्याच्या घरात थेट बेडरूमपर्यंत जाऊन अशा प्रकारचे स्टिंग ऑपरेशन करणं योग्य आहे का?” तसेच ते म्हणाले, “या प्रकरणात पोलिस आणि निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करतील. ज्यांच्या घरात पैसे आहेत त्यांनी ते पैसे कुठून आणले? कोणत्या व्यवहारातील आहेत? हेही समोर येणारच आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांवर आरोप करणे योग्य नाही. एखाद्याच्या घरात, तेही बेडरूमपर्यंत जाण्याचा अधिकार कोणाला आहे?”

याच मुद्द्यावर भाजप नेते आणि निलेश राणे यांचे भाऊ, मंत्री नितेश राणे यांनीही भाष्य केले. ते म्हणाले, “रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना प्रत्येक जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात फिरावे लागते. त्यामुळे याकडे राजकीय चष्म्यातून पाहायलाच हवे. उद्या आम्ही मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल बोललो आणि असा धिंगाणा घातला तर?”

ते पुढे म्हणाले, “कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे स्वतःचे व्यवसाय असतात. व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय? आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये. जो नियम आम्हाला लागतो तोच सर्वांना लागणार आहे. 'हमाम में सब नंगे हैं', असे म्हणत नितेश राणे यांनी निलेश राणे यांच्या स्टिंग ऑपरेशनवर प्रतिक्रिया दिली.” या प्रतिक्रियेने पुन्हा एकदा कोकणात नितेश राणे आणि निलेश राणे या बंधूंचा राजकीय वाद टोकाला पोहोचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Malvan Sting operation; Nilesh rane, Chandrashekhar Bawankule, Nitesh Rane And Ravindra Chavhan
Nilesh Rane : तळकोकणात युती तुटण्यामागे नेमकं कोण? भावाला सेफ करत नीलेश राणेंनी खापर फोडलं भाजपच्या बड्या नेत्यावर

FAQs :

1. निलेश राणेंच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये नेमकं काय सापडलं?
→ रोकड भरलेली बॅग सापडल्याचा दावा करण्यात आला.

2. निलेश राणेंनी कोणावर आरोप केले?
→ रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले.

3. या आरोपांना कोणाने प्रत्युत्तर दिले?
→ रवींद्र चव्हाण, नितेश राणे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.

4. या प्रकरणामुळे मालवणच्या निवडणुकीवर काय परिणाम झाला?
→ निवडणूक स्फोटक बनली असून वातावरण तापले आहे.

5. हे प्रकरण कोणत्या निवडणुकीशी संबंधित आहे?
→ मालवण नगरपालिका निवडणुकीशी संबंधित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com