Kokan Politics : शिवसेनेनं ऐनवेळी नकार दिलाच तर राष्ट्रवादीचा बॅकअप प्लॅन; तटकरे योगेश कदमांना दाखवणार 'राजकीय कॅल्क्युलेशन'?

Kokan Politics : मंडणगडमध्ये शिवसेनेच्या युतीबाबत निर्णय न झाल्याने राजकीय अनिश्चितता आहे. मंत्री योगेश कदम विरुद्ध खासदार सुनील तटकरे अशी तीव्र स्पर्धा असून इतर पक्ष सावध हालचाली करत आहेत.
Mandangad politics tense as Shiv Sena’s alliance decision remains undecided.
Mandangad politics tense as Shiv Sena’s alliance decision remains undecided.Sarkarnama
Published on
Updated on

- सचिन माळी

रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मंडणगड तालुक्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. युती किंवा आघाडीबाबत स्पष्ट चित्र नसल्याने उमेदवारांची धावपळ वाढली आहे. विजयाची शक्यता अधिक असलेल्या गटातून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली असून, विविध पक्षांतील नेत्यांमध्ये सध्या राजकीय गणितांची उकल सुरू आहे. राज्य स्तरावर जरी महायुती असली तरी या निवडणुकीत मंडणगड तालुक्यात गृह राज्यमंत्री योगेश कदम (शिवसेना) आणि खासदार सुनील तटकरे (राष्ट्रवादी) यांचे स्वतंत्र प्राबल्य किती किती आहे हे स्पष्ट होणार आहे.

शिवसेना आघाडीवर पण युतीबाबत संभ्रम कायम;

सध्या तालुक्यात इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेना आघाडीवर असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते. मात्र, शिवसेनेने मित्रपक्षांसोबत युती करायची की स्वतंत्र लढायचे, याबाबत स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे मित्र पक्षांसह इतर गट आणि इच्छुकही वेटिंगवर आहेत. जर शिवसेनेने युतीला नकार दिला तर उरलेले पक्ष आणि गट एकत्र येऊन निवडणूक प्रभावी करण्याचा प्रयत्न करतील, अशा प्राथमिक हालचाली पडद्यामागे सुरू झाल्या आहेत.

भाजप, काँग्रेसचे स्थानिक अस्तित्व कमी, शिवसेना राष्ट्रवादीत फूट;

भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पातळीवरील पक्ष असले तरी, तालुक्यात त्यांची संघटनशक्ती कमी झाल्याचे दिसते. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन स्थानिक प्रभावी पक्षांचे चार गटांत विभाजन झाल्याने मतविभाजन अधिक वाढले आहे. त्यामुळे 'कोअर व्होटबँक' नेमकी कोणाकडे आहे? याबाबत राजकीय विश्लेषकांमध्येही संभ्रम आहे.

Mandangad politics tense as Shiv Sena’s alliance decision remains undecided.
Kokan BJP: रवींद्र चव्हाणांनी चिपळूणमध्ये पाऊल ठेवताच भाजपमधला वाद भडकला; जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

नगरपंचायत निवडणुकीने दिला अनुभव :

अलीकडे नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात इतर सर्व पक्ष एकत्र आले होते. त्या लढतीत शिवसेनेने संघटनशक्ती आणि संघटित रणनीती दाखवून दिली. त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्रपणे मैदानात उतरण्यास तयार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Mandangad politics tense as Shiv Sena’s alliance decision remains undecided.
Kokan Politics : तळकोकणात ठाकरेंना धक्का, आठ गावातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

तिकीटासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा तीव्र

शिवसेनेत उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा आहे. इच्छुक उमेदवार विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आगामी दिवसांत कोणता उमेदवार कोणत्या गटातून रिंगणात उतरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, तालुक्यातील राजकारण सध्या पडद्यामागील बैठका, गुप्तभेटी आणि नव्या समीकरणांच्या चर्चांनी तापलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com