Kokan BJP: रवींद्र चव्हाणांनी चिपळूणमध्ये पाऊल ठेवताच भाजपमधला वाद भडकला; जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

BJP Politics: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात होणारी सुसाट इनकमिंग ही भाजपसाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. गेल्या तीन दिवसांत भाजपने प्रत्येक नगरपालिकेत विशेष निरीक्षक पाठवून स्थानिक पातळीवर सखोल माहिती गोळा केली.
BJP Ravindra Chavan
BJP Ravindra Chavan Sarkarnama
Published on
Updated on

Kokan News : आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना चांगलाच वेग पकडला आहे. कोकणातही विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाची सरासरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही कायम राखण्याचं आव्हान महायुतीतील भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर असणार आहे.

एकीकडे रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद वाढला असतानाच भाजप (BJP) मात्र आपली ताकद वाढवत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांचे पक्ष फोडताना दिसत असून भाजप मात्र येतील ते आपलेच म्हणत प्रवेश देताना दिसत आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लक्ष करताना दिसत आहे.

स्थानिकच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी कोकणात सुरू केली आहे. पण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे कोकण दौर्‍यावर आले असताना भाजपला मोठा धक्का बसला आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे सध्या कोकण दौर्‍यावर आले आहेत. खेड येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपचा मेळावाही तितक्याच उत्साहात पार पडला. मात्र, त्यानंतर चव्हाण हे चिपळूण येथे आले असता स्थानिक भाजपमधला वाद उफाळून आला.

BJP Ravindra Chavan
Bjp Politcs: अजित पवारांना रोखण्यासाठी भाजपने उतरवले पाच मातब्बर मैदानात! सोपवल्या 'या' महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुढील दौरा रद्द करत थेट सिंधुदुर्ग गाठल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रत्नागिरी कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली आहे. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी राजीनामा नेमका कोणत्या कारणाने दिला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात होणारी सुसाट इनकमिंग ही भाजपसाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. गेल्या तीन दिवसांत भाजपने प्रत्येक नगरपालिकेत विशेष निरीक्षक पाठवून स्थानिक पातळीवर सखोल माहिती गोळा केली.

BJP Ravindra Chavan
Eknath Shinde News: एकनाथ शिंदेंची कोल्हापुरात गर्जना; म्हणाले,'विधानसभेला विरोधकांचा गाडा 'सिंगल' पलटी केला, आता...'

राज्यातील आगामी नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपनं थेट नगराध्यक्षपदासाठी प्रत्येक नगरपालिका क्षेत्रासाठी तीन-तीन उमेदवारांची नावे अंतिम करून घेतली आहेत. या निरीक्षकांनी नगराध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवारांची तीन नावे लिफाफ्यात बंद करून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com