अजितदादांसमोर फुशारकी मारली.. पण उदय सामंतांसाठी अडचणीची ठरली!

उदय सामंत (Uday Samant) यांच्याविरोधात रत्नागिरीतील शिवसैनिक आक्रमक
Uday Samant
Uday Samant Sarkarnama
Published on
Updated on

चिपळूण : राजकारणात गुप्ततेने केलेले काम उघड करायचे नसते. आपणच एखादी मदत केली असेल तर स्वतःच त्याविषयी सांगणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखेच असते. त्याचा अनुभव उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना आज आला असेल. त्याला कारण घडले ते येथे शिवसंपर्क अभियान यशस्वी करण्याच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीचे. (Shivsena latest news)

बैठकीच्या नियोजनापेक्षा पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेच शिवसैनिकांकडून टार्गेट झाले. या बैठकीत पालकमंत्री बदला आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. उत्तर रत्नागिरी भागातील पाच तालुक्यांतून पालकमंत्री बदलाच्या मागणीला बैठकीत जोर धरला होता. या भागातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्‍यांनी आपली खदखद पक्ष नेतृत्वासमोर मांडली. यामुळे शिवसेनेत खळबळ माजली आहे.

Uday Samant
Sarkarnama Open Mic Challenge: मोदींची तुलना फक्त नेहरूंशीच: आ. परिणय फुके

उदय सामंतांवर रोष होण्याचे कारण त्यांचे एक विधान. चिपळूणमधील राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपण कशा पद्धतीने मदत केली, हे या ठिकाणी सांगणार नाही, असे विधान सामंत यांनी सावर्डे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर काही दिवसांपूर्वी केले होते. याचा अर्थ त्यांनी शिवसेनेच्या विरोधात काम केल्याचे उघडरित्या स्वतःच सांगितले. त्यानंतर चिपळूणमधील शिवसेनेचे कार्यकर्ते मंत्री सामंत यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. मंत्री सामंत यांनी शिवसेनेत राहून शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केले, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी आजच्या बैठकीत केली. पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

िल्ह्यात २६ ते २९ मेदरम्यान शिवसंपर्क अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख शरद बोरकर आणि जिल्हा संपर्कप्रमुख सुनील मोरे यांच्या उपस्थितीमध्ये आज बहादूर शेखनाका येथील पुष्कर सभागृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्यासह खेड-दापोली-मंडणगड गुहागर तालुक्यांचे अध्यक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Uday Samant
Sarkarnama open mic : खासदार जलील यांना कठीण प्रश्न आणि त्यांची चपखल उत्तरे

बैठकीत कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी तसेच विभागप्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख यांनी काय काम केले, याविषयी पक्षाकडून नेहमी अहवाल मागवला जातो. मागील अडीच वर्षांत पालकमंत्री अनिल परब यांनी काय काम केले, याचा खुलासा करावा. पालकमंत्री जिल्ह्यात फिरकत नाहीत, कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामे होतात; मात्र शिवसैनिकांची कामे होत नाहीत, असा आरोप करण्यात आला.

चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम पालकमंत्री करत आहेत. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत पालकमंत्री आले आणि दोन गटांत वाद लावून निघून गेले. त्यानंतर पालकमंत्री राष्ट्रीय कार्यक्रम वगळता जिल्ह्यात कधी फिरकत नाहीत. संघटनेकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे पालकमंत्री जिल्ह्याला नको, अशी मागणी उत्तर रत्नागिरीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. चिपळूण तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केल्यानंतर उर्वरित तालुक्यांतून पालकमंत्री बदलाच्या मागणीला जोर धरला गेला.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आक्रमकता पाहून पदाधिकारी अचंबित झाले. तुमच्या मागण्या आम्ही पक्ष नेतृत्वपर्यंत पोहोचवतो, अशी ग्वाही सुनील मोरे आणि शरद बोरकर यांनी दिल्यानंतर पदाधिकारी शांत झाले.

Uday Samant
Sarkarnama open Mic challenge | रितेश देशमुख धीरज यांना Tips देतात का?

‘शिवसंपर्क’ योगेश कदम यांच्याकडे
दापोली मतदार संघात शिवसंपर्क अभियान राबवण्याची जबाबदारी आमदार योगेश कदम यांच्यावर सोपवण्यात आली आहे, याची घोषणा शरद बोरकर यांनी केली. त्यामुळे सभागृहातच घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. दापोलीमध्ये माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि आमदार योगेश कदम यांचे गट आहेत. शिवसंपर्क अभियान नक्की कोण राबवणार, याकडे सर्वांचे लक्ष होते; मात्र नेतृत्वाकडून योगेश कदम यांचे नाव निश्‍चित करण्यात आल्याची माहिती बैठकीत दिली.

मोठे नेते आल्यानंतर कार्यकर्त्यांना बोलता येत नाही. पोटातील मळमळ बाहेर काढता येत नाही. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद बाहेर यावी, यासाठी आम्ही आमच्या स्तरावर बैठक घेत असतो. त्यांचे दुःख नेतृत्वापर्यंत पोहोचवले जाते. आजची बैठक ही शिवसंपर्क अभियानाच्या संदर्भातील होती. कार्यकर्त्यांनी जे विचार मांडले ते नेतृत्वापर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाईल, अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com