Kokan News : तळ कोकणातील गावाचा धडाकेबाज निर्णय! आता गावची जमीन फक्त गावकऱ्यांसाठी!

Maharashtra Marathi News : सध्या तळ कोकणात फार्म हाऊसचे प्रचंड पेव फुटले असून परराज्यातील किंवा बाहेर जिल्ह्यातील व्यक्ती येथे जमिनी घेऊन गुंतवणूक करताना दिसत आहेत.
Morvane land sale ban
Morvane land sale bansarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामपंचायतीचा महत्वाचा निर्णय

  2. गावातील जमीन गावाबाहेरील किंवा परजिल्ह्यातील लोकांना आता विकता येणार नाही

  3. या बाबत ग्रामपंचायतीने ठराव केला असून तो स्थानिकांच्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी घेण्यात आला आहे.

Ratnagiri News : तळ कोकणात निसर्ग सौंदर्य अफाट असल्याने इकडे मुंबई, पुणेकरांसह परप्रांतीयांकडून गुंतवणूक होताना दिसत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस केले जात आहेत. शेत जमिनी घेऊन त्या विकसित केल्या जात आहेत. ज्यामुळे काही ठिकाणी मूळ नैसर्गिक अधिवास नष्ट होत असून त्याचा थेट नैसर्गिक जलस्त्रोतांवर परिणाम होत आहे. यामुळे तळ कोकणातील चिपळूण तालुक्यातील एका गावाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना दुसऱ्या तालुक्यातीलच काय तर दुसऱ्या जिल्ह्यातील लोकांना विक्री न करण्याचा ग्रामपंचायतील एकमुखी ठरावच करून घेतला आहे. यामुळे आता या गावाची राज्यभर चर्चा होत असून परराज्यातील किंवा बाहेर जिल्ह्यातील असो किंवा आपल्याच जिल्ह्यातील दुसऱ्या तालुक्यातील लोकांनाही जमिन घेता येणार नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामपंचायतीने हा ठराव केला आहे. या ठरावा प्रमाणे गावातील जमीन गावाबाहेरील अथवा परजिल्ह्यातील व्यक्तींना विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. एखाद्या वेळी आर्थिक संकंटामुळे कोणाला जमीन विकायची झाल्यास ती फक्त गावातील व्यक्तिला घेता येणार आहे.

दरम्यान मोरवणे ग्रामपंचायतीने हा निर्णय घेण्यामागे जमिनी खरेदी विक्रीच्या व्यवहारातूनही काही दलाल गब्बर झाले आहेत. यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी जमीन उरणार नाही, असा धोका असल्यानेच निर्णय घेतल्याचे म्हटलं आहे. तसेच गावाच्या हद्दीतील जमिनी या गावकऱ्यांच्या हक्कासाठी राखीव ठेवायला हव्यात अशी भूमिका ग्रामस्थांची आहे.

Morvane land sale ban
Kokan News : महादेव जानकर योगींच्या राज्यातून लोकसभा लढणार; भाजप, सेनेकडून सापत्न वागणूक

तळ कोकणात निसर्ग सौंदर्य अफाट असल्याने बाहेरचे लोक येथे लाखोंची गुंतवणूक करत आहेत. जमिनी घेत आहेत. यामुळे ग्रामीण संस्कृतीचा बाज कमी होत असून गावाचा सामाजिक समतोल बिघडताना दिसत आहे.

तर बाहेरचे लोक जमिनी घेत असल्याने आता स्थानिक तरुणांना शेतीसाठीच काय तर घरे बांधण्यासाठीही जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळेच हा ठराव करण्यात आला आहे. हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही. मात्र तो गावाच्या सामाजिक विकासासाठी बंधनकारक आहे. त्यामुळेच ग्रामस्थांनीच आता या ठरावाच्या अंमलबजावणी जबाबदारी घेतली आहे. तसेच जर कोणी या ठरावाच्या विरोधात जावून जमीन विकण्याचा प्रयत्न केलाच तर ग्रामसभा घेऊन त्याला विरोध करण्याचीही भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

Morvane land sale ban
Kokan News : लोकसभेला ठाकरेंना मदत, 'कोकण पदवीधर'वर काँग्रेसचा दावा; प्रवीण ठाकूर यांचं पटोलेंना पत्र

FAQs :

प्र.1: मोरवणे ग्रामपंचायतीचा ठराव नेमका काय?
उ.1: गावातील जमीन गावाबाहेरील अथवा परजिल्ह्यातील व्यक्तींना विकता येणार नाही. या विक्रीवर बंदी घालणारा ठराव मंजूर केला.

प्र.2: हा ठराव रत्नागिरी जिल्ह्यात कुठे मंजूर करण्यात आला?
उ.2: हा ठराव रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामपंचायतीत करण्यात आला.

प्र.3: हा ठराव का करण्यात आला?
उ.3: गावकऱ्यांची जमीन संरक्षणासाठी आणि बाहेरील लोकांकडे जमीन जाण्यापासून रोखण्यासाठी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com