

नारायण राणे यांनी अलीकडेच राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर राजकारणात चर्चा रंगल्या आहेत.
चिपळूण येथील कृषी महोत्सवात भाषण करत असताना त्यांना अचानक भोवळ आली आणि आवाज बसला.
प्रकृती बिघडल्याने त्यांनी भाषण थांबवल्यामुळे कार्यक्रमस्थळी खळबळ उडाली.
Ratnagiri News : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी आपल्या राजकीय निवृत्तचे संकेत दिले. त्यांच्या या संकेतामुळे राज्याच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे. अशातच आज (ता.५) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे एका कार्यक्रमात बोलत असतानाच त्यांची प्रकृती बिघडल्याचे समोर येत आहे. कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमातच त्यांना अचानक भोवळ आली, त्यांचा आवाज बसल्याचे समोर आले आहे. यानंतर त्यांनी आपले भाषण थांबवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी स्टेजवर भाजप नेते रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, कैलास गोरंट्याल, नारायण कुचे, भास्कर दानवे, संतोष दानवे उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आयोजित 'कृषी महोत्सव' कार्यक्रमाला नारायण राणेंनी उपस्थित लावली. यावेळी व्यासपीठावरच भाषण करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा आवाज बसला. तसेच त्यांना चक्कर येत असल्याचे जाणवले. यानंतर त्यांनी आपले भाषण थांबवले. याचवेळी जवळच असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना आधार दिला. तसेच त्यांना खुर्चीकडे नेले. भोवळ आल्याने काही मिनिटे पत्नी समवेत बसून त्यांनी विश्रांती घेतली. या घटनेनंतर राणे त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले असून ते गेस्ट हाऊसकडे रवाना झाले. सध्या नारायण राणे विश्रामगृहात परतले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तरीही डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याचे समजते. दरम्यान आता या घटनेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान रविवारीच जाहीर सभेत नारायण राणे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यांनी आता वयोमानानुसार थांबायला हवे, असे सूचक विधान केले होते. ज्याची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या या विधानानंतर आता भाजपमध्येही खळबळ उडाली असून प्रवीण दरेकर यांच्यासह इतर नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तर या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असतानाच, आज त्यांची तब्बेत बिघडली. त्यांना भोवळ आली आणि आवाज बसला. यामुळे आता समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही ठाकरे एकत्र आले असून भाजपला रोखण्यासाठी त्यांनी रोड मॅप तयार केला आहे.
तर दुसरीकडे भाजपकडून कोकणी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी राणेंना मुंबईच्या मैदानात उतरवले जाणार आहे. पण त्यांनी कालच वाढते वय, शरीर आणि दोन्ही मुलांचा दाखला देताना आता थांबले पाहिजे असे विधान केले होते. त्या पाठेपाठ आज त्यांची प्रकृती बिघडल्याने भाजपला आपल्या रणनीतीत बदल करावा लागणार असल्याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.
Q1. नारायण राणेंची तब्येत कुठे बिघडली?
➡️ रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमात.
Q2. नेमकी काय अडचण निर्माण झाली?
➡️ त्यांना अचानक भोवळ आली आणि आवाज बसल्याचे दिसून आले.
Q3. त्यांनी भाषण पूर्ण केले का?
➡️ नाही, प्रकृती अस्वस्थ झाल्याने भाषण अर्ध्यावरच थांबवले.
Q4. या घटनेमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे का?
➡️ होय, निवृत्तीच्या संकेतांनंतर ही घटना घडल्याने चर्चांना अधिक वेग आला आहे.
Q5. सध्या नारायण राणेंच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती आहे का?
➡️ सध्या तपशीलवार अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.