Narayan Rane : "भाजपमध्ये माझी अडचण होते" ; नारायण राणे असं का म्हणाले?

Narayan Rane : "शिवसेना टक्केवारीचा पक्ष..."
Narayan Rane
Narayan Rane Sarkarnama

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जाहीर सभेतून पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. कोकणातील आंगडेवाडी येथील जत्रेच्या कार्यक्रमात नारायण राणे बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले. भाजपमध्ये आल्यापासून आपली अडचण होते, असेही राणे म्हणाले,

Narayan Rane
Kasba byelection : ब्राम्हण समाजाच्या नाराजीला मिळणार वाट; काँग्रेसकडून रोहित टिळकांच्या नावाचा विचार सुरु...

"उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस बोलायला लागले, तेव्हा फटाके फुटले. मलाही फटाके काढता येतात. आणि जेव्हा काढेन ना तेव्हा पळता भुई थोडी होईल. या जिल्ह्यात पण राहू देणार नाही. मी सहन करतोय, कारण आता भाजपमध्ये आलोय. म्हणून माझी अडचण झालीये. काय करायला गेलो तर लक्षात येतं, अर्रर्र मी भाजपमध्ये आहे. सहनशील, शांत विचारसणीची सगळे लोकं आहेत. आपण ही त्याच्यातच बसतो. त्याप्रमाणे दाखवायला पाहिजे," असे राणे म्हणाले.

Narayan Rane
Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेबाबत ज्ञानेश्वर म्हात्रेंनंतर सत्यजीत तांबेंचेही महत्त्वाचे विधान; म्हणाले...

"एक पत्रकार आहे, नोकरीदार नेता आहे. दिल्लीच्या कक्षेतच आहे. दिल्लीत कधीतरी, कुठेतरी भेट होईलच," असा इशाराही राणेंनी संजय राऊत यांना नाव नाव न घेताच दिला. बाळासाहेबानंतर शिवसेना पक्ष टक्केवारी खाणारा आहे. शिवसेनेनी मुंबई महापालिका लुटली. उद्धव ठाकरे तुम्ही कोकणासाठी काय केलं? एन्रॉनला कोणी विरोध केली? कोणी कंत्राट मिळवली? असे नारायण राणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com