Mayor Candidates : भाजपची साथ मिळताच तटकरेंची मोठी घोषणा; दोन नगरपरिषदांसाठी नगराध्यक्षपदांचे कारभारीही ठरवले

NCP mayor candidates : जिल्ह्यातील नगरपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चे बांधणी करण्यात करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नगराध्यक्षपदाबाबत मोठी घोषणा केली आहे. पण खोपोली नगराध्यक्षपदाचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यात ठेवला आहे.
NCP mayor candidates; Sunil Tatkare
NCP mayor candidates; Sunil Tatkaresarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. रायगड जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन महत्त्वाच्या उमेदवारांची घोषणा केली.

  2. माथेरान तर कर्जतमध्ये नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली.

  3. ही घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केली असून स्थानिक पातळीवर चर्चेला उधाण आले आहे.

Raigad News : आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रायगडमध्ये जोरदार हालटाची सुरू झाल्या असून येथे महायुतीत उभी फूट पडली आहे. नुकताच राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्याची घोषणा केली. तर नगराध्यक्ष पदाबाबत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे घोषणा करतील असेही म्हटलं होते. त्याप्रमाणे तटकरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माथेरान आणि कर्जत नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांची नावाची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता येथील राजकीय वातावरण तापले आहे.

आगामी स्थानिकसह जिल्ह्यातील सध्या होत असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील तिनही राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. पण आता येथे महायुती राहिली नसून भाजप-आणि राष्ट्रवादीने युती केली आहे. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादामुळे ही युती करण्यात आली असून येथे राष्ट्रवादीने वेगळा निर्णय घेतलाय.

या निर्णयानंतर आता राष्ट्रवादीकडून माथेरान नगरपरिषदेसाठी अजय सावंत आणि कर्जत नगरपरिषदेसाठी पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी तटकरे यांनी जाहीर केली आहे. यामुळे आता शिवसेने विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना येथे पहायला मिळणार आहे. खोपोली नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या जागेवरून पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू असल्याने अद्याप नाव जाहीर करण्यात आलेले नाही. तर तटकरेंनी उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

NCP mayor candidates; Sunil Tatkare
Satara Mayor Election : साताऱ्यात नगराध्यपदासाठी महिला नेत्याची 'वरपर्यंत' लॉबिंग; मुंबईत तळ ठोकून घेतल्या गाठीभेटी

एकीकडे जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीसंदर्भात पदाधिकारी व नेतेमंडळींमध्ये हालचाली करताना दिसत आहेत. अनेकदा युती राहावी म्हणून शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी दोनदा युतीचा प्रस्ताव राष्ट्रवादी समोर ठेवत जागा वाटपाचा फॉर्म्युलाही सांगितला होता. पण तो राष्ट्रवादीने मानला नाही. उलट तटकरे यांनी याची खिल्ली उडवली होती.

दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी कुलदिपक शेंडे यांचे नाव निश्चित केले आहे. तर नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत भाजपही असून यशवंत साबळे यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील आणि माजी नगरसेवक व माजी सभापती मंगेश दळवी, व माजी नगरसेविका अश्विनी ताई पाटील यांनी दंड थोपाटले आहेत. महाविकास आघाडीसह मनसे ,आरपीआयने देखील नगराध्यक्ष पदासाठी चाचपणी केली असून गराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. पण आघाडी किंवा नसे ,आरपीआय आणि शेकाप कोणता निर्णय घेणार याकडे युती लक्ष देवून आहे.

NCP mayor candidates; Sunil Tatkare
Mayor Eletion : अलिबागमध्ये मविआत ट्वीस्ट, एकत्र आहोत म्हणाणाऱ्या शेकापचा स्मार्ट मूव्ह; नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्षाच्या मुलीच्या नावाची घोषणा

तटकरेंची कसोटी

सध्या येथील खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या जागेवरून राष्ट्र्वादीतच पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे. पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी चारही उमेदवार बाशिंग बांधून बसल्याचे येथील चित्र आहे. तर शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांकडून पक्ष नेतृत्वाकडे आग्रह धरला आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरच पक्षांतर्गत असंतोष बाहेर पडण्याची शक्यता आहे. या शक्यतेमुळेच तटकरे यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला नसल्याची चर्चा येथे चर्चा आहे. तर शेवटच्या टप्प्यात घोषणा होण्याची शक्यता आहे.

FAQs :

1. राष्ट्रवादीने कोणत्या नगरपरिषदांसाठी उमेदवार जाहीर केले?
→ माथेरान आणि कर्जत नगरपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले.

2. माथेरानसाठी कोणाला उमेदवारी मिळाली?
→ अजय सावंत यांना उमेदवारी देण्यात आली.

3. कर्जतसाठी कोण उमेदवार आहेत?
→ पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांची नगराध्यक्षपदासाठी निवड झाली.

4. ही घोषणा कोणी केली?
→ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी.

5. या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणात काय परिणाम दिसतो?
→ निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वाढली असून राष्ट्रवादीने ताकद दाखवल्याचे संकेत मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com