NCP Corporator's son Arrested: दापोली नगरपंचायतीत कोट्यावधींची भ्रष्टाचार; राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या मुलाला अटक

Dapoli Nagar Panchayat Corruption Case: नगरपंचायतीतील कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनंतर आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Dapoli nagarpanchayat Politics
Dapoli nagarpanchayat PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Dapoli News: दापोलीचे राष्ट्रवादीचे (NCP) नगरसेवक अन्वर रखांगे यांचा मुलगा फैजान रखांगे याला रत्नागिरी (ratnagiri) जिल्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. दापोली नगरपंचयातीत फैजान याने कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. (NCP corporator's son arrested in Dapoli Nagar Panchayat corruption case)

दापोली नगरपंचायतीचे निलंबित कर्मचारी लेखापाल दीपक सावंत याने कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दापोली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. तो सध्या जामीनावरती मुक्त आहे. फैजान याच्या खात्यावर दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केल्याचे दिपक सावंतने पोलिसांना सांगितले होते. (Kokan Political News)

Dapoli nagarpanchayat Politics
Eknath Shinde Ayodhya Visit: निघाले अयोध्येला...पोहोचले सुलतानपूरला ! अयोध्या दौऱ्यात नक्की घडलं काय?

सावंतकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिस फैजानवर नजर ठेवून होते.पण फैजान भारताबाहेर गेल्याचे सांगितले जात होते.पण दापोलीत येताच आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने फैजानला अटक केली.दापोली नगरपंचायतीत झालेल्या कोट्यावधींच्या घोटाळ्यात आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या सुपुत्राचाच नंबर लागल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सावंत याने दापोलीतील काही विद्यमान लोकप्रतिनिधींच्या पर्यटन दौऱ्यासाठी बुकिंग केली होती.या पर्यटनाचा सर्व खर्च सावंत यांच्याच खात्यावरून करण्यात आला होता. अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अजून काही मोठे लोक पोलिसांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com