Municipal election : राष्ट्रवादीने तिसऱ्या नगराध्यक्षपदाचा सस्पेन्सही संपवला, भाजपने दावा करूनही पदरात काहीच नाही

Sunil Tatkare's Khopoli Nagarparishad election Politics : जिल्ह्यातील नगरपरिषदेसह नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.
Municipal election; Sunil Tatkare
Municipal election; Sunil Tatkaresarkarnama
Published on
Updated on
Summary
  • खोपोली नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून डॉ. सुनील पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

  • भाजपच्या दाव्यामुळे आणि पक्षातीलच सुरू असलेल्या रस्सीखेचीत घोषणा काही काळ रखडली होती.

  • जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी अधिकृत घोषणा करताच खोपोलीच्या राजकारणात नवीन उत्सुकता निर्माण झाली आहे.

Raigad News : आगामी नगर परिषदेच्या निवडणुका जिंकण्यासह नगराध्यक्षपदावर ताबा मिळवण्यासाठी रायगडमध्ये जोरदार हालटाची सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदेंच्या शिवसेनेशी सुरू असलेल्या वादानंतर थेट फारकत घेत महायुती तुटणारी घोषणा केली. राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्याची घोषणा केली.

त्यापाठोपाठ प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माथेरान आणि कर्जत नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. पण खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या जागेवरून पक्षातच सुरू असणारी रस्सीखेच आणि भाजपने केलेला दावा यामुळे याची घोषणा करण्यात आली नव्हती. पण आता जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी याची आता घोषणा करत सस्पेन्सही संपवला आहे. यामुळे जिल्ह्यातील माथेरान, कर्जत आणि खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचेच उमेदवार असतील हे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीकडून माथेरान नगरपरिषदेसाठी अजय सावंत आणि कर्जत नगरपरिषदेसाठी पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी तटकरे यांनी जाहीर केली. मात्र खोपोली नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या जागेवरून पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू असल्याने नाव जाहीर केली नव्हती. त्यांनी उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवले होते. त्यामुळे येथे कोणाचे नाव पुढे येते याची जिल्ह्यात उत्सुकता लागली होती.

Municipal election; Sunil Tatkare
Sunil Tatkare : रायगडच्या रोह्यात तटकरेंची हुकूमत शिंदेंचा शिलेदार मोडून काढणार? राष्ट्रवादीविरोधात भाजपची शिवसेनेला रसद?

दरम्यान आता खोपोली नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडू्‌‍न डॉ.सुनिल पाटील यांच्या नावाला उमेदवार म्हणून पसंती देण्यात आल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी शनिवारी केली. यामुळे अखेर खोपोलीच्या नगराध्यक्षपदाचा तिढा सुटला आहे. मात्र येथे अद्याप नाराजी असून माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर,माजी नगरसेवक मंगेश दळवी यांची मनधरणी करण्यात तटकरे यशस्वी होणार का हे पाहावं लागणार आहे.

खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण पडल्याने प्रत्येक पक्षाने या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर दावा केला होता. त्यातच येथे राष्ट्रवादीने थेट शिवसेनेशी फारकत घेतली. तर भाजपला जवळ करत युती केली. तसेच कर्जत आणि खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राष्ट्रवादीने जाहीर केले. यामुळे खोपोली भाजपसाठी सोडली जाईल अशी चर्चा होती. तसा दावाच भाजपने दोन एक दिवसांपूर्वी केला होता. मात्र पक्षाकडून नावाची घोषणा करण्यात आली नव्हती.

पण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत राहिली असतानाही नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष घारे यांनी खोपोलीत पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.सुनील पाटील असतील अशी घोषणा केली. यामुळे आता राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि मतदारांमधील संभ्रम दूर झाला आहे.

Municipal election; Sunil Tatkare
Sunil Tatkare : राष्ट्रवादी-ठाकरेंच्या शिवसेनेत गुप्त बैठका? महायुतीत संभ्रमाची स्थिती, तटकरेंनीच फोडला ‘युतीचा’ फुगा!

FAQs :

1. खोपोली नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने कोणाची निवड केली?

राष्ट्रवादीने डॉ. सुनील पाटील यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून निवड केली आहे.

2. घोषणेला उशीर का झाला?

पक्षातील रस्सीखेच आणि भाजपने केलेल्या दाव्यांमुळे घोषणा काही काळ थांबवण्यात आली होती.

3. घोषणा कोणी अधिकृतपणे केली?

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी शनिवारी अधिकृत घोषणा केली.

4. या घोषणेचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?

या निर्णयामुळे निवडणुकीतील समीकरणे बदलू शकतात आणि पक्षांतर्गत गटबाजीही थांबण्याची शक्यता आहे.

5. भाजपचा या जागेवर काय दावा होता?

भाजपने या जागेवरून दावा केला होता, त्यामुळे राजकीय तणाव निर्माण झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com