Sunil Tatkare : राष्ट्रवादी-ठाकरेंच्या शिवसेनेत गुप्त बैठका? महायुतीत संभ्रमाची स्थिती, तटकरेंनीच फोडला ‘युतीचा’ फुगा!

Sunil Tatkare On NCP-Shivsena UBT Alliance : नुकताच राज्यातील महायुतीला कोकणात तडा गेल्याची माहिती समोर आली होती. येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी फारकत घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी युती केली.
Sunil Tatkare
Sunil Tatkaresarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत युती जाहीर करण्यात आली.

  2. या बैठकीत जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत उपस्थित होते.

  3. मात्र, सुनील तटकरे यांनी या युतीला “दिवाळी निमित्त गाठीभेट” म्हटलं असून पक्षाने ही बैठक काल्पनिक असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Raigad News : रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या शिवसेनेत वाद काही केल्या थांबलेला नाही. पालकमंत्रीपदावरचा दावा शिवसेनेसह राष्ट्रवादीने देखील सोडला नसून मंत्री भरत गोगावले आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. यामुळेच येथे महायुतीच संपुष्टात आली असून नव्या युतीचा जन्म झाला आहे. राष्ट्रवादीने आगामी स्थानिकच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी कर्जत विधानसभा मतदारसंघात युती केलीय. याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झाली. यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यातील वादामुळे कर्जतच्या राजकारणात मोठी उलथा पालथ झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रवादीने वाद घालणाऱ्या आणि टीका करणाऱ्या शिवसेनेशी फारकत घेतली. तर ठाकरेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी केली.राष्ट्रवादीने शिंदेंच्या शिवसेनेला धोबीपछाड देण्यासाठीच हा राजकीय डाव खेळल्याचे आता बोलले जात आहे.

यामुळे शिंदेंची शिवसेना देखील आक्रमक झाली असून आमदार महेंद्र दळवी यांनी यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुती म्हणून एकत्र येण्याची आमची भूमिका आहे. पण सुनील तटकरे आपल्या फायद्यासाठी असे प्रयोग करत असतात. त्यांनी असले हे प्रयोग थांबवावेत, अन्यथा आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असा दम भरला आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणावरून कर्जतमधील अनपेक्षित आघाडीमुळे शिवसेनेसह भाजपची चिंता वाढल्याचे समोर येत आहे. तसेच या घडामोडीमुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Sunil Tatkare
Sunil Tatkare : शिवसेना-राष्ट्रवादीत वाद वाढला? सुनील तटकरेंचा शिवसेनेला थेट इशारा; म्हणाले, 'मी शांतपणाने ऐकतोय, पण...'

राज्य पातळीवर सत्तेत एकत्र असलेली राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदेंची शिवसेना मात्र स्थानिक पातळीवर एकमेकांसमोर उभी ठाठल्याची सध्या चर्चा सुरू आहे. अशातच आता तटकरे याच्यासह पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तटकरे यांनी, कर्जतमध्ये पक्षाचे स्थानिक नेते सुधाकर घारे आणि नितीन सावंत आणि त्यांचे कार्यकर्ते दिवाळी असल्याने एकत्रित आल्याचे म्हटलं आहे. त्यांनी या विषयावर अधिक चर्चा करण्याचेही यावेळी टाळले.

तर रायगडच्या कर्जतमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरे यांची सेना एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी त्या बैठकीला कथाकल्पित मीटिंग म्हणत नाकारले आहे. तसेच त्या बैठकीत झालेली युतीच्या घोषणेचे वृत्त अत्यंत चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी हा महायुतीतला एक जबाबदार पक्ष असून आगामी स्थानिक आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवाणार आहोत. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशिल आहेत. महायुतीसाठी या तिन्ही नेत्यांचा आग्रह आहे. पण जिथे महायुती शक्य होणार नाही तिथे मैत्रिपूर्ण लढती होतील. पण यामुळे महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारची कटूता येणार नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे.

Sunil Tatkare
Sunil Tatkare : स्थानिकच्या तोंडावर शिवसेनेची सामंजस्याची भूमिका? युतीचा हात गोगावलेंनी पुढे केला मात्र तटकरे म्हणतात, 'आधी खालच्या थराला जावून टीका केली, अन् आता...'

FAQs :

1. कर्जत येथे कोणत्या पक्षांची युती जाहीर झाली?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची युती जाहीर झाली.

2. या बैठकीत कोणते नेते उपस्थित होते?
राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आणि शिवसेनेचे नितीन सावंत उपस्थित होते.

3. सुनील तटकरे यांनी या युतीबाबत काय म्हटलं?
त्यांनी ही बैठक दिवाळी निमित्त एकत्र येण्याची असल्याचे सांगितले.

4. राष्ट्रवादी पक्षाने या युतीची पुष्टी केली का?
नाही, पक्षाने ही बैठक “कथाकल्पित” असल्याचे सांगून नाकारली.

5. या युतीमुळे कोणता राजकीय वाद निर्माण झाला आहे?
महायुतीतील मतभेद आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत गोंधळ पुन्हा समोर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com