शत्रू मोठा आहे, त्याला पराभूत करण्यासाठी ताकद उभारावी लागेल : जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी 'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या चौथ्या पर्वाची सुरूवात आज (ता.22 ऑक्टोबर) कोकण विभागातील वसई येथून केली आहे.
Jayant Patil
Jayant Patil sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आपला पक्ष प्रत्येक वॉर्डात प्रत्येक मतदारसंघात वाढला पाहिजे. येणाऱ्या पिढीला आपण आपल्या पंखाखाली घ्यायला हवे. त्यांच्या विचारांशी समन्वय साधायला हवा. ही नवी पिढीच इथे बदल घडवेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी वसई येथे व्यक्त केला. 'राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या चौथ्या पर्वाची सुरूवात पाटील यांनी आज (ता.22 ऑक्टोबर) कोकण विभागातील वसई येथून केली.

Jayant Patil
गृहखातं कसं असतं?, असं जयंत पाटलांनी विचारलं अन् आबांनी अशी टाकली गुगली...

यावेळी त्यांनी वसई-विरार (Vasai-Virar) कार्यकारणीची आढावा बैठक घेतली. आपला पक्ष हा शरद पवार (Sharad Pawar) यांचा एक विचार आहे. हा विचार भक्कम व्हायला हवा. यासाठी मी आणि माझे सहकारी राज्यभरात फिरत असल्याचे पाटील यांनी सांगितले. मतांची बेरीज वाढवण्यासाठी तुम्ही तुमची रणनीती तयार करा, तुम्हाला पूर्ण स्वतंत्र आहे, मला तुमच्याकडून चांगला निकाल हवा आहे. बाहेर शत्रू मोठा आहे, त्यामुळे त्याला पराभूत करण्यासाठी आपल्याला ताकद उभारावी लागेल ही खूणगाठ मनाशी बांधा, असे मार्गदर्शनही पाटील यांनी बैठकीत केले.

वसई-विरार, नालासोपारा हा भाग एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. स्वातंत्र्य चळवळीसाठी इथल्या लोकांनी मोठे योगदान दिले. या भागात सर्व समाजाचे, सर्व भाषिक लोक राहतात, त्यामुळे इथे सर्वांना सोबत घेऊन राजकारण करावे लागेल, असे स्पष्ट मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मांडले. इथे किल्ला लढवणे सोपे नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठामपणे उभे आहेत हे कौतुकास्पद आहे. हळूहळू का होईना इथे पक्ष वाढेल, असा विश्वासही आव्हाड यांनी व्यक्त केला

Jayant Patil
जयंत पाटील यांनी केली नीलेश लंकेंची अण्णा हजारेंशी तुलना

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील भुसारा, वसई-विरार शहराध्यक्ष राजाराम मुळीक, निरीक्षक आनंद ठाकूर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, एलजीबीटी प्रदेशाध्यक्ष प्रिया पाटील, महिला निरीक्षक सुनिता देशमुख, युवक शहराध्यक्ष योगेश पंधरे, महिला शहराध्यक्ष मेघा म्हात्रे, अश्विनी गुरव, युवती शहराध्यक्ष करिष्मा खामकर, विद्यार्थी शहराध्यक्ष मनिष वर्मा, विद्यार्थी राज्य समन्वयक शुभम जटाळ आदी उपस्थित होते.

कितीही आदळआपट करा राज्य सरकार एकसंध राहील! जयंत पाटील यांचा केंद्र सरकारला टोला

नालासोपारा : महाविकास आघाडी सरकार नामोहरम करण्यासाठी केंद्र सरकारकडून नानाविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. ईडीमार्फत वेगवेगळी माहिती काढून दबाव निर्माण केला जात आहे. राजकीय नेत्यांची १० ते १५ वर्षांपूर्वीची प्रकरणे काढायची आणि मागे लागायचे हे काम केंद्र सरकार करत आहे, असा आरोप आज (ता.22 ऑक्टोबर) जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वसई येथे केला.

जयंत पाटील म्हणाले, आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचे सरकार स्थिर आहे. राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांत वेगवेगळ्या पक्षांतील कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. त्यामुळे आमचे आघाडी सरकार एकसंध राहणार आहे. कुणी कितीही आदळआपट केली तरी काही फरक पडणार नाही.

Jayant Patil
जयंत पाटील आणि अजितदादांनी काँग्रेसमध्येच भांडणाची वात लावली...

कोकण विभागातील परिसंवाद कार्यक्रमांतर्गत विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आज पालघर दौरा केला. कोकण विभागातील राष्ट्रवादीच्या परिसंवादाची सुरुवात वसई-विरारमधून झाली. वसई-विरार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणी कशी करावी याचे मार्गदर्शनही केले. या वेळी वसई-विरार शहर जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक, आमदार सुनील भुसारा, माजी आमदार आनंद ठाकूर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com