जयंत पाटील यांनी केली नीलेश लंकेंची अण्णा हजारेंशी तुलना

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी आज अहमदनगर ( Ahmednagar ) शहर, पारनेर ( Parner ) व श्रीगोंदे ( Shrigonde ) येथे पक्ष बांधणी कामाच्या पाहणीसाठी आढावा बैठका घेतल्या.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

पारनेर ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यात विधान परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था आदींच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी दोन दिवस अहमदनगर जिल्ह्यात आले आहेत. या यात्रे निमित्त जयंत पाटील यांनी आज अहमदनगर शहर, पारनेर व श्रीगोंदे येथे पक्ष बांधणी कामाच्या पाहणीसाठी आढावा बैठका घेतल्या.

पारनेरमधील आढावा बैठकीला आमदार नीलेश लंके, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, अहमदनगर निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Jayant Patil
जयंत पाटील म्हणतात, संदीप क्षीरसागर पवार साहेबांचे सर्वात लाडके आमदार..

जयंत पाटील म्हणाले, आमदार नीलेश लंके यांच्या कामाचा डंका सातासमुद्रापार वाजत आहे. त्यांनी कोविडमध्ये जे काम केले ते न भूतो ना भविष्यती होते. लोकसंपर्क असलेला नेता म्हणून नीलेश लंके यांची ओळख निर्माण झाली आहे. लोकसंपर्क असलेला नेता म्हणून नीलेश लंके यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्यामुळे आज तरूण पिढीचा पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला असून तरुण पिढी पक्षाच्या पाठिशी उभी रहात आहे. राळेगणसिद्धी हा परिसर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नावाने ओळखला जातो आता तो नीलेश लंके यांच्या नावाने ओळखला जाईल.

पूर्वी चार आणे वाढले तरी आंदोलन व्हायचे मात्र महागाई दरवाढ होऊनही यावर कोण आंदोलन करत नाही. नरेंद्र मोदी यांनी लोकांना महागाईची सवयच लावली आहे. पक्षाच्या माध्यमातून हे विषय लक्षात आणून देण्यासाठी आंदोलन उभे केले पाहिजे. नरेंद्र मोदी आपल्याला मदत करत नाही हे लक्षात आल्यावर सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

खासदार किरीट सोमय्यांना टोला लगावताना जयंत पाटील म्हणाले, किरीट सोमय्या म्हणतात महाराष्ट्रातील अर्धे मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल. व्वा रे बिट्या तुला कुणी सांगितलं ? ईडीचे नोटीस येण्याआधी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं ? याचा अर्थ भाजपतर्फे तपास यंत्रणेचा गैरवापर केला जातोय असा थेट आरोप जयंत पाटील यांनी पारनेर येथे केला.

Jayant Patil
जयंत पाटील आले आणि सुजय विखेंचे टेन्शन वाढवून गेले

हे सगळं महाराष्ट्रातील सरकारला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचलं जात आहे. मंत्र्यांचं नावं घ्या नाहीतर तुमच्यावर कारवाई करू असे सांगून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. भाजप चुकीची संस्कृती महाराष्ट्रात आणू पाहत आहे. ही गोष्ट आपल्याला थांबवायची आहे. त्यासाठी आपले संघटन मजबूत करायला हवे असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

एजन्सीचा वापर करून गुंडगिरी सुरू आहे. सुडाचे राजकारण राज्यात नव्हे तर देशातही कधी झालेले नाही मात्र भाजपकडून ऐनकेन प्रकारे सुरू आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

निसर्गाची शेतकऱ्यांवर अवकृपा झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात संततधार सुरू आहे. धरणे तुडुंब भरली आहेत. पिकांचं नुकसान झाले आहे. शेतकरीच उरला नाही तर पाणी मिळून फायदा काय ?म्हणून या अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे पूर्ण करत, पडेल ती किंमत देऊ पण शेतकऱ्यांना दिलासा देऊ ही महाविकास आघाडीची भूमिका आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com