Lok Sabha Election 2024 : सुनील तटकरे रायगडमधून लोकसभा लढवणार का ? स्वत: दिली मोठी माहिती

Sunil Tatkare On Raigad Lok sabha 2024: आगामी लोकसभा निवडणुकींसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून प्रत्येक राजकीय पक्षांनी मोठ्या हालचाली सुरु केल्या आहेत.
Sunil Tatkare
Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकींसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आली असून राजकीय नेते मंडळींनी सभा, मेळावे, बैठका घेण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे यंदाचं वर्ष हे निवडणुकींचं ठरणार आहे. या अनुषंगाने प्रत्येक पक्षातून लोकसभा निवडणुकींसाठी योग्य चेहऱ्याची चाचपणी करण्यात येत आहे. यातच रायगडमधून निवडणूक लढवण्याची इच्छा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. (Lok Sabha Election 2024)

आगामी लोकसभा निवडणुकींसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून प्रत्येक पक्षाने मोठ्या हालचाली सुरु केल्या आहेत. काही ठिकाणी उमेदवारांची देखील चाचपणी सुरु आहे. ज्या मतदारसंघात आपला उमेदवार निवडून आला होता तिथे पुन्हा त्याच पक्षाला उमेदवारी देण्यात येऊ शकते, असा फॉर्म्युला असू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Tatkare
Baramati Politics : बारामती राष्ट्रवादीत अजितदादांजवळ जाण्यासाठी स्पर्धा; अंतर्गत कुरघोडी वाढल्या ?

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी रायगडमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, हा निर्णय महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर ठरणार आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

राजकीय गणितं कशी बदलली ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील वर्षभरात अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे सध्या राजकीय गणितं बदलेली आहेत. महायुतीत शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) सहभागी झाले. या दोन्ही पक्षात फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गटाने भाजपसोबत युती केली. पण आता आगामी निवडणुकींसाठी मतदान किती टक्क्यांनी कोणत्या पक्षाला पडणार ? हा पॅटर्न देखील महत्वाचा ठरणार आहे. कारण गेल्या निवडणुकीत काही ठिकाणी आमदार आणि खासदारांना पक्षामुळे देखील जास्त मतदान झालं होतं. मात्र, यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे.

रायगड मतदारसंघावार मनसेचा डोळा ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. त्यासाठी ते स्वतः दौरे करत असून आढावा बैठका घेत आहेत. राज ठाकरे यांनी रायगड लोकसभेसाठी चाचपणी सुरु केली असल्याची माहिती आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात मनसेने राजकीय परिस्थितीचा आणि पक्षाच्या राजकीय ताकदीचा अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. सध्या रायगड लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे सुनील तटकरे हे खासदार आहेत. त्यामुळे सुनील तटकरे यांच्यासमोर उमेदवार कोण असणार ? मनसेने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास तटकरे यांच्या विरोधात चेहरा कोण देणार ? हे येणाऱ्या काळातच पाहायला मिळणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Sunil Tatkare
Abhishek Ghosalkar Case : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर मुंबई पोलिस अ‍ॅक्शन मोडवर; घेतला 'हा' मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com