Sunil Tatkare : सुनील तटकरेंच्या विजयात 'नोटा'ची साथ, तब्बल 27 हजार जणांनी...

NCP Sunil Tatkare victory 27 Thousand Voters Pressed Nota : 2014 मध्ये अनंत गितेंकडून अवघ्या दोन हजार मतांनी सुनिल तटकरेंना पराभव झाला. मात्र, या पराभवाची परतफेड तटकरेंनी 2019 मध्ये केली.
NCP Sunil Tatkare victory
NCP Sunil Tatkare victorysarkarnama

Sunil Tatkare News : लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला अवघी एक जागा मिळाली. रायगडमधून सुनील तटकरे विजयी झाले. अनंत गिते यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, पेण, अलिबाग, श्रीवर्धन मतदारसंघात मिळालेल्या भरघोस लीडमुळे तटकरेंचा मोठा विजय झाला. मात्र, रायगड लोकसभा मतदारसंघात तब्बल 27 हजार 188 जणांनी नोटाचा वापर केला आहे.

2014 मध्ये अनंत गितेंकडून अवघ्या दोन हजार मतांनी सुनिल तटकरेंना Sunil Tatkare पराभव झाला. मात्र, या पराभवाची परतफेड तटकरेंनी 2019 मध्ये केली. मात्र यंदा शिवसेनेत पडलेल्या फूटीमुळे उद्धव ठाकरेंना सहानुभूती होती. या सहानुभूतीवर अनंत गिते सहज विजयी होतील असा अंदाज होता. मात्र, हा अंदाज फोल ठरलाय.

सुनिल तटकरे यांनी अलिबाग आणि पेण मतदारसंघातून तब्बल 80 हजारांचे लीड घेतले. तर , त्यांनी आपल्या होमग्राऊंड श्रीवर्धनमध्ये देखील लीड मिळाले. तर, अनंत गितेंना गुहागर, दापोली मतदारसंघात लीड मिळाले मात्र अलिबाग आणि पेणमध्ये तटकरेंना मिळालेल्या लीडच्या तुलनेत कमीच होते. त्यामुळे तब्बल 80 हजारांच्या लीडने तटकरे विजयी झाले.

NCP Sunil Tatkare victory
BJP Vs Shivsena: "राणे बंधुंनी सांभाळून बोलावं अन्यथा..." निलेश राणेंच्या 'त्या' आरोपावरुन शिंदे गट आक्रमक

महायुतीला धोक्याची घंटा

सुनील तटकरेंना महाड विधानसभा मतदारसंघात वघे चार हजारांचे लीड मिळाले आहे.तर, गुहागर मतदारसंघात अनंत गितेंना 74 हजार 626, तटकरे यांना 47 हजार 030, तर दापोली मतदारसंघात अनंत गिते यांना 77 हजार 503 तर तटकरे यांना 69 हजार ७१ मते आहेत. त्यामुळे महायुती ती मतदारसंघामध्ये डेंजर झोनमध्ये असल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com