जयंत पाटलांनी वाढवले आमदार रविशेठ पाटील अन्‌ शेकापचे टेन्शन...

पेण विधानसभा मतदारसंघ आपल्याला घड्याळाच्या चिन्हावर लढवायचा आहे.
Jayant Patil- Ravi Sheth Patil-jayant patil
Jayant Patil- Ravi Sheth Patil-jayant patilSarkarnama
Published on
Updated on

पेण : ‘पेण विधानसभा मतदारसंघ आपल्याला घड्याळाच्या चिन्हावर लढवायचा आहे,’ असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील (Ravi Sheth Patil) आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे (PWP) टेन्शन वाढवले आहे. (Jayant Patil raises tensions between MLA Ravi Sheth Patil and PWP)

राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा आज (ता. १२ एप्रिल) पेण विधानसभा मतदारसंघात पोचली. या मतदारसंघाचा आढावा घेताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पेण मतदारसंघाबाबत सूचक वक्तव्य केले. ते म्हणाले की, पेण विधानसभा मतदारसंघ आपल्याला घड्याळाच्या चिन्हावर लढवायचा आहे. तुम्ही तुमचं काम यापुढेही असंच चालू ठेवावे, तुमची प्रगती अशीच चांगली राहिली, तर माझ्याकडून एबी फॉर्म घेऊन जावा.

Jayant Patil- Ravi Sheth Patil-jayant patil
रमजान ईदपर्यंत मस्जिदींवरील भोंगे उतरवा : राज ठाकरेंची सरकारला नवी डेडलाईन

मागील निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपकडून रविशेठ पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे तत्कालीन आमदार धैर्यशील पाटील यांचा पराभव केला. तत्पूर्वी धैर्यशील पाटील यांनी दोनवेळा पेण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे, तर तब्बल ४० वर्षे हा मतदारसंघ शेकापच्या ताब्यात होता. मागील निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर लढलेले रविशेठ पाटील यांनी धैर्यशील यांना तब्बल २४ हजार मतांनी धोबीपछाड दिली आहे. गेल्या निवडणुकीत शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. त्यानंतरही त्यांचा पराभव झाला, त्यामुळे राष्ट्रवादीने जर हा मतदारसंघ लढवायचा ठरवला तर शेकापला मोठ्या जोमाने कामाला लागावे लागणार आहे.

Jayant Patil- Ravi Sheth Patil-jayant patil
ईडीच्या नोटिशीवर राज ठाकरे प्रथमच बोलले...‘या हाताने कधी पापच केले नाही; त्यामुळे...’

राष्ट्रवादी काँग्रेसची मागील निवडणुकीत शेकापशी युती होती. त्याचा फायदा सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीसाठी झाला होता. तसाच तो विधानसभेला शेकापलाही काही ठिकाणी झाला होता. मात्र, आता राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास तो शेकापला विचार करायला लावणारा आहे. तसेच, भाजपच्या रविशेठ पाटील यांनाही सूचक इशारा आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी आहे. तसेच तटकरे हे बेरजेचे राजकारण करणारे आहेत, त्यामुळे या दोन्ही पक्षांना राष्ट्रवादी अडचणीत आणू शकते.

Jayant Patil- Ravi Sheth Patil-jayant patil
मी काँग्रेसचा शहराध्यक्ष; पैसे दे नाही तर महिला अंगावर सोडेन : धमकी देत लाटली १८ लाखांची जमीन

जयंत पाटील काय म्हणाले?

पेण विधानसभा मतदारसंघ आपल्याला घड्याळाच्या चिन्हावर लढवायचा आहे. तुम्ही तुमचं काम यापुढेही असंच चालू ठेवावे, तुमची प्रगती अशीच चांगली राहिली, तर माझ्याकडून एबी फॉर्म घेऊन जा, असे जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil- Ravi Sheth Patil-jayant patil
जयंत पाटलांची ‘एबी फाॅर्म’ घेऊन जायची ऑफर..!

सुनील तटकरे यांचा दावा

सुनील तटकरे यांनी सांगितले की, गेल्या २२ वर्षांत आपण पेणमध्ये अधिकृतरित्या राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढवली नाही. लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला. मात्र, २०१९ मध्ये पेण, रोहा, श्रीवर्धन या तालुक्यांनी भरभरून मतदान केले आणि माझा विजय झाला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जर वेळेवर झाल्या असत्या, तर राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले असते. मात्र, निवडणूक कधीही होवोत राष्ट्रवादीच एक नंबरवर राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com