Supriya Sule : निलेश राणेंवर तुटून पडणाऱ्या भाजपची पिसं सुप्रिया सुळेंनी काढली, खरे देशभक्त… म्हणत केलं तोंड भरून कौतुक

Supriya Sule Slams BJP Over Nilesh Rane Sting operation : निलेश राणेंच्या मालवणच्या व्हिडीओने राज्याभर खळबळ उडवून दिली होती. त्याच व्हिडिओ प्रकरणाने आता थेट दिल्ली दरबारात खळबळ उडवून दिली असून भाजपच्या लक्ष्मीदर्शनावरून लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
Sting operation; Supriya Sule, Nilesh Rane And Ravindra Chavan
Sting operation; Supriya Sule, Nilesh Rane And Ravindra Chavansarkarnama
Published on
Updated on
Summary
  • सिंधुदुर्ग नगरपरिषद निवडणुकांतील लक्ष्मीदर्शन प्रकरण आणि स्टिंग ऑपरेशनमुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला.

  • संसदेत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका करत निलेश राणेंच्या स्टिंगचे कौतुक केले.

  • भाजपकडे एवढी मोठी रक्कम कुठून आली, असा गंभीर सवाल सुप्रिया सुळेंनी सभागृहात उपस्थित केला.

Delhi/Sindhuhurg News : नुकताच सिंधुदुर्ग सह राज्यातीस नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी मतदानाच्याआधी आणि मतदाना दिवशी जिल्ह्यात जोरदार राडा झाला. मतदानाच्या आधी मालवणमध्ये झालेल्या लक्ष्मीदर्शनाची राज्यभर जोरदार चर्चा झाली. तर ज्या शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करून भाजपचा खरा चेहरा उगड केला. त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून हे प्रकरण चांगलेच तापले होते. आता याच प्रकरणावरून दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले. येथे अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भर सभागृहात भाजपची पिसं काढत लक्ष्मीदर्शनावरुन आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी यावेळी ‘निलेश राणे हे देशभक्तीचं खरे उदाहरण असल्याचे म्हणत निलेश राणेंचे कौतुक केलं. तसेच भाजपकडे एवढे पैसे आले कुठून असाही सवाल उपस्थित केला आहे.

सध्या राज्य आणि केंद्रात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दोन्हीकडे लोकप्रतिनिधी आपल्या आपल्या मतदारसंघाचे प्रश्न पलटावर मांडत असून विविध मुद्यांवर आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत. अशात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत पैशांच्या थैल्या उघड झाल्याचे प्रकरण संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पटलावर आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरात नोटांचे बंडल असलेल्या थैल्या सापडल्या. एवढे पैसे आले कोठून असा सवाल करत भाजपवर बरीच टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

त्यांनी मंगळवारी (दि.९ डिसेंबर) लोकसभेत बोलताना निलेश राणेंनी पैसे पकडून दिल्याच्या मुद्द्याचा उल्लेख करत भाजपवर जोरदार टीका केली. एवढंच नव्हे तर निलेश राणे हे देशभक्तीचं उदाहरण असून भाजपचे चिमटेही काढले. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या राज्यात भाजपचं सरकार असून युतीचे २०० हून अधिक आमदार आहेत. पण या निवडणुका खऱ्या अर्थाने सरळ मार्गी झाल्या नाहीत.

Sting operation; Supriya Sule, Nilesh Rane And Ravindra Chavan
संसदेत सुळेंचा मराठीत प्रश्न, गडकरींनी पाहा काय उत्तर दिलं? Supriya Sule, Nitin Gadkari, Parliament

जे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं. भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरात कॅश पकडली, ती मी नाही तर. इथे जे बसले आहेत, त्यांचे मित्र पक्ष असलेल्या एका पक्षाच्या आमदाराने पकडले आहेत. हा आमदार भाजप नेत्याच्या घरात गेला, ज्या घरातून लाखो रुपयांची रोकड पकडली. फक्त रोकड पकडलीच नाही तर ती लाईव्ह दाखवली. या ही गोष्ट सगळ्या न्यूज चॅनलने दाखवली. त्यामुळे मी काही आरोप करत नसून जे आहे ते सांगतेय, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

रोकड रक्कम.. हे काही एक उदाहरण नाही, अशी 10 उदाहरणं मी सांगू शकते. आमच्या महाराष्ट्रात निवडणूक आयोग नाहीच. असेल तर नेमकी कुठे आहे हे आम्हाला तरी माहीत नाही. आम्ही त्यांना भेटायलो जातो तेव्हा आयोगाचं मौन व्रत असतं. निवडणुकांमध्ये बंदुकी काढल्या गेल्या, ईव्हीएमचे लॉक देखील तोडले गेले. हे सगळं टीव्हीवर दाखवण्यात आलं आहे. इथे म्हस्के आणि श्रीकांत शिंदे बसले आहेत. हे त्याच सरकारचे भाग आहेत. यांच्याच लोकांनी हे उघडकीस आणलं आहे. ते याच शिवसेनेचे खासदार आहेत. त्यांनाच विचारून घ्या. राणे साहेब इथे नाहीत. पण राणे साहेबांचा मुलगा निलेश राणे हे आमच्या बरोबर खासदार म्हणून आधी निवडून आले होते.

‘मी आज ऑन रेकॉर्ड सांगते की, ते भलेही आज शिवसेनेत असोत. पण निलेश राणेंनी जे केलं त्याचं मी स्वागत करते. देशभक्तीचं जर उदाहरण असेल तर ते निलेशजींचे आहे. ते सत्ताधारी पक्षात आहे तरीही त्यांनी देशासाठी रोकड पकडून दिली. एवढंच नव्हे तर त्यांनी सगळ्या देशाला दाखवून दिलं टीव्हीवर की बघा भाजप काय करतंय.’ असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. दरम्यान आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप-शिवसेना वादावर पडदा पडला असून रवींद्र चव्हाण यांच्यासह निलेश राणेंनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हा मुद्दा फक्त निवडणुकीनंतर संपल्याचेही त्यांनी म्हटले होते.

Sting operation; Supriya Sule, Nilesh Rane And Ravindra Chavan
Supriya Sule: महाराष्ट्राच्या लौकिकास बट्टा, आयोगाची भूमिका बघ्याची; सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

FAQs :

1. लक्ष्मीदर्शन प्रकरण काय आहे?
सिंधुदुर्गमध्ये निवडणुकीच्या आधी रोख रकमेचे वाटप झाल्याचा आरोप असून त्याला ‘लक्ष्मीदर्शन’ असे नाव दिले गेले.

2. निलेश राणेंनी काय स्टिंग केले?
राणेंनी भाजपच्या कथित रोख देवाणघेवाणीचा स्टिंग ऑपरेशनद्वारे खुलासा केला.

3. सुप्रिया सुळे संसदेत का भडकल्या?
त्यांनी निवडणुकीतील पैशांच्या गैरवापरावरून भाजपला तीव्र शब्दांत सुनावले.

4. निलेश राणेंवर गुन्हा का दाखल करण्यात आला?
स्टिंग ऑपरेशनच्या प्रक्रियेबद्दल तक्रार दाखल झाल्याने राणेंवर गुन्हा नोंदवला गेला.

5. या प्रकरणाचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम झाला?
राजकारण तापले असून भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com