Supriya Sule: महाराष्ट्राच्या लौकिकास बट्टा, आयोगाची भूमिका बघ्याची; सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Local body election results delay Supriya Sule letter TO cm Devendra Fadnavis: "महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात राज्यातील काही भागांमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामाऱ्या झाल्याची दृश्ये काही माध्यमांमध्ये पाहण्यास मिळाली हे अत्यंत खेद जनक होतं," असे सुप्रिया सुळे यांनी यांनी म्हटलं आहे.
Supriya Sule letter TO cm Devendra Fadnavis
Supriya Sule letter TO cm Devendra Fadnavis
Published on
Updated on

Pune News: नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मंगळवारी संपूर्ण राज्यभरामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. आता कोर्टाच्या निर्णयानुसार 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. मात्र मतदान प्रक्रिया दरम्यान राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी दोन पक्षाचे गट एकामेकांविरोधात भिडल्याचे पाहायला मिळालं.

काही ठिकाणी शाब्दिक चकमक तर काही ठिकाणी मारहाणीचे प्रकार देखील घडले. यावरून आता विरोधी पक्ष आक्रमक झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.

"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात राज्यातील काही भागांमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामाऱ्या झाल्याची दृश्ये काही माध्यमांमध्ये पाहण्यास मिळाली हे अत्यंत खेद जनक होतं," असे सुप्रिया सुळे यांनी यांनी म्हटलं आहे.

देशाला दिशा दाखविणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात या घटना घडूच कशा शकतात, अशी खेदाची भावना असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Supriya Sule letter TO cm Devendra Fadnavis
PMO: मोदींचा ऐतिहासिक निर्णय! ७८ वर्षे जुनं कार्यालय आता ओळखलं जाणार ‘सेवा तीर्थ’

या भूमीने सदैव लोकशाही मूल्यांचा पुरस्कार केला असून ती रुजविण्यासाठी राष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आहे. सशक्त लोकशाही असणाऱ्या, प्रबोधनात्मक आणि संविधानात्मक विचारांची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात निवडणूकीच्या दरम्यान तुंबळ हाणामाऱ्या होतात, हे सर्वथा अयोग्य, अनुचित आणि राज्याच्या लौकीकास न शोभणारे आहे.

निवडणूक आयोगाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करणे आवश्यक होते. परंतु आयोगाने येथे केवळ बघ्याची भूमिका घेतलेली दिसते हे अतिशय क्लेशदायक आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या लौकीकास बट्टा लावणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी या पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com