Ratnagiri Crime : कोकरे महाराजाचा पाय आणखी खोलात, अत्याचाराची आणखी एक तक्रार दाखल, पीडित मुलीच्या घरातील महिलेचाही समावेश

Bhagwan Kokare Maharaj : लोटे औद्योगिक वसाहतीतील अनधिकृत गोशाळा तसेच मुलींच्या शोषणप्रकरणी संशयित भगवान कोकरे महाराज याचा आणखीन खोलात गेला आहे.
Ratnagiri Crime Bhagwan Kokare Maharaj
Ratnagiri Crime Bhagwan Kokare Maharaj sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. लोटे औद्योगिक वसाहतीतील मुलींच्या शोषण प्रकरणात अडकलेले भगवान कोकरे महाराज यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

  2. पोलिस कोठडीत असतानाच त्यांच्या विरोधात अल्पवयीन मुलींच्या शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  3. प्रीतेश प्रभाकर कदम यांच्यावर देखील या नव्या गुन्ह्यात कारवाई सुरू असून पोलिस तपास वेगाने सुरू आहे.

Ratnagiri Crime News : लोटे औद्योगिक वसाहतीतील अनधिकृत गोशाळा तसेच अल्पवयीन मुलींच्या शोषणाची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी भगवान कोकरे महाराज आणि त्यांचे सहकारी प्रीतेश प्रभाकर कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर त्यांना न्यायालयास हजर केले असता त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या दरम्यान आता आणखी एका प्रकरणात कोकरे महाराज याचा पाय आणखी खोलात गेला आहे. आणखी एका अल्पवयीन मुलीने कोकरे यांच्याविरोधात लैंगिक शोषण केल्याबाबत तक्रार दिली आहे. तर याबाबत खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कोकरे महाराजासह त्याचा सहकारी प्रीतेश कदम, तसेच पीडित मुलीच्या आत्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, 16 ऑक्टोबर 2024 ते 18 जून 2025 या कालावधीत खेड तालुक्यातील एका पीडितेने दिलेल्या जबाबानुसार कोकरे महाराजाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेत शिक्षक प्रीतेश कदम आणि तिची आत्या रोहिणी यांचाही सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पीडितेने पोलिसांना दिली.

पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, मागील काही काळापासून ती भगवान कोकरे महाराज याच्याकडे शिक्षण घेण्यासाठी राहत होती. त्या वेळी याने अनेकदा तिच्याशी अश्लील वर्तन करत तिला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. यावेळी याची वाच्यता न करता तिने ही घटना एका सदस्याला सांगितली. पण त्याने याबाबत कुठे काही वाच्यता न करता गप्प राहण्याचा सल्ला दिला.

Ratnagiri Crime Bhagwan Kokare Maharaj
Ratnagiri Crime : रत्नागिरी हादरलं! वारकरी शाळेच्या संस्थापकाचं काळं रूप, अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार? भास्कर जाधवांचे गंभीर आरोप; म्हणाले, 'कोकरे हा भाजप...'

तसेच महाराजांची सामाजिक व राजकीय ओळख असून कोणाला हे सांगितल्यास उलट कुटुंबात आणि समाजात तुझी बदनामी होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे ती गप्प झाली. पण वारंवार अशा प्रकारच्या घटना पीडितेबरोबर होत राहिल्याने अखेर तिने सर्व प्रकार तिच्या कुटुंबाला सांगितला. यानंतरच कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत या संदर्भात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास करत आहेत.

या तक्रारीवरून खेड पोलिसांनी तिघांविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोकरे महाराज याच्याविरोधात झालेल्या दुसऱ्या तक्रारीमुळे हे प्रकरण अधिक गंभीर आणि संवेदनशील झाले आहे. काही दिवसांपूर्वीच पहिल्या पीडितेच्या तक्रारीनंतर कोकरे महाराज आणि शिक्षक कदम यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. आता या नव्या प्रकरणामुळे त्यांच्यावर कडक कारवाईची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, लोटे गुरुकुलामध्ये अनाथ, निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना मोफत शिक्षण व आध्यात्मिक संस्कार दिले जात असल्याचा दावा केला जात होता. मात्र, येथे अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण सुरू असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. या विरोधात स्थानिकांकडून आणि सामाजिक संघटनांकडून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे. तसेच या प्रकरणी लोटे परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी गुरूवारी (ता. 16) खेड शहरात मोर्चा काढला. तर यावेळी अनधिकृत गोशाळा आणि मुलींच्या शोषणप्रकरणी कोकरे याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणात स्वतः गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दखल घेतली असून ‘कोकरे’ प्रकरणात निःपक्षपाती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी, धार्मिक बाबींशी जोडलेल्या भगवान कोकरे याने असे करणे योग्य नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक आणि निःपक्षपाती कारवाई करा, अशा सूचना पोलिसांना दिल्याचे सांगितले आहे.

Ratnagiri Crime Bhagwan Kokare Maharaj
Ratnagiri ZP reservation : 'मिनी मंत्रालया'च्या आरक्षणात उलथापालथ! रामदास कदमांच्या बंधूंना धक्का, भास्कर जाधवांच्या मुलाला दिलासा!

FAQs :

1. भगवान कोकरे महाराज कोण आहेत?
ते लोटे औद्योगिक वसाहतीतील एक स्वयंघोषित महाराज असून त्यांच्या नावावर अनेक शोषणाचे आरोप आहेत.

2. नवीन गुन्हा कोणत्या कारणावरून दाखल झाला आहे?
अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या प्रकरणी नव्याने पुरावे सापडल्याने पोलिसांनी नवा गुन्हा दाखल केला आहे.

3. भगवान कोकरे महाराज सध्या कुठे आहेत?
ते सध्या पोलिस कोठडीत आहेत आणि तपास सुरू आहे.

4. प्रीतेश कदम यांची भूमिका काय आहे?
ते भगवान कोकरे महाराजांचे सहकारी असून या प्रकरणात सह-अभियुक्त आहेत.

5. पुढील तपास कसा सुरू आहे?
पोलिसांनी पीडित मुलींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली असून तपास अधिकाऱ्यांच्या टीमकडून अधिक पुरावे गोळा केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com