Ratnagiri Crime : रत्नागिरी हादरलं! वारकरी शाळेच्या संस्थापकाचं काळं रूप, अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार? भास्कर जाधवांचे गंभीर आरोप; म्हणाले, 'कोकरे हा भाजप...'

Bhaskar Jadhav React On warakari school scandal : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे येथील वारकरी शिक्षण देणाऱ्या शाळेत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhavsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. खेड तालुक्यातील वारकरी शिक्षण संस्थेतील संस्थापक भगवान कोकरेवर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप झाला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

  2. पीडित मुलीने तक्रार दाखल करताच खेड पोलिसांनी त्वरीत कारवाई केली आणि कोकरेला ताब्यात घेतले.

  3. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी कोकरेवर अनेक मुलींच्या शोषणाचे गंभीर आरोप करून जिल्ह्यात खळबळ उडवली आहे.

Ratnagiri Crime News : काही महिन्यांपूर्वी आळंदीतील एका वारकरी शिक्षण संस्थेत मुलीवर अत्यातार झाल्याची बातमी समोर आली होती. यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर अवघ्या सहा महिन्यातच अशी दुसरी घटना समोर आली असून रत्नागिरीतील खेड येथील एका गावात अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण झाले आहे. हे शोषणं वारकरी शिक्षण संस्थेत झाले आहे. तर याप्रकरणी संस्थेच्या संस्थापकासह कार्यकारी अधिकाऱ्याला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे आता खळबळ उडाली आहे. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील एका वारकरी शिक्षण देणाऱ्या शाळेत घडली आहे. तर गुन्हा दाखल झालेल्या संस्थापकाचे नाव भगवान कोकरे असून कार्यकारी अधिकाऱ्याचे नाव प्रतेश कदम असे आहे. या दोघांच्या मुसक्या खेड पोलिसांनी आवळल्या आहेत.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील वारकरी शिक्षण देणाऱ्या शाळेतील अल्पवयीन मुलीवर संस्थेचे संस्थापक भगवान कोकरे जून महिन्यापासून लैंगिक शोषण करत होता. भगवान कोकरे हा गोशाळा संस्थापक ही असून या प्रकरणी संबंधीत अल्पवयीन मुलीनं तक्रार दिली होती. त्याप्रमाणे कोकरे याला खेड पोलिसांनी अटक केली. तर या अटकेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात आता खळबळ उडाली आहे.

तक्रारी प्रमाणे पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा म्हणजे पोस्को अंतर्गत कलम 12 व 17 प्रमाणे तसेच BNS 74,351(3) 85 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या अटकेनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आक्रमक झाले आहेत. तर ज्या नेत्यांनी गोशाळेत येऊन भाषणे ठोकली त्यांना आता आसमान दाखवू असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला आहे.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : 'रामदास कदमांची आता उलटी गिनती सुरू', शस्त्र परवाना प्रकरणावरून उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने डागली तोफ

भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत कोकरे हा भाजपशी जोडला गेला असून ज्या नेत्यांनी गोशाळेत येऊन भाषणे केली त्यांना आता आसमान दाखवणार. यासाठी आता लवकरच सभा घेऊन भगवान कोकरे याचा खरा चेहरा जगा समोर आणू असेही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच भास्कर जाधव यांनी भगवान कोकरे यांनी अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपही केला आहे.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : ‘छमछमदास, बामदास, भडवेगिरी करणारा, श्वान....’ भास्कर जाधवांकडून रामदास कदमांवर हल्लाबोल

FAQs :

1. भगवान कोकरे कोण आहेत?
➡️ भगवान कोकरे हे रत्नागिरी जिल्ह्यातील वारकरी शिक्षण देणाऱ्या शाळेचे व गोशाळेचे संस्थापक आहेत.

2. त्यांच्यावर नेमका आरोप काय आहे?
➡️ त्यांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

3. पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे?
➡️ खेड पोलिसांनी कोकरेला अटक करून पुढील चौकशी सुरू केली आहे.

4. भास्कर जाधव यांनी काय म्हटलं आहे?
➡️ त्यांनी असा दावा केला की, भगवान कोकरे यांनी अनेक मुलींचे लैंगिक शोषण केले आहे.

5. जिल्ह्यात या घटनेनंतर काय प्रतिक्रिया आहेत?
➡️ रत्नागिरीत संतापाचे वातावरण असून धार्मिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com