

Sindhudurg News : गेल्याच महिन्यात कुडाळ-मालवणच्या राजकारणात माजी आमदार वैभव नाईक आणि विद्यमान आमदार नीलेश राणे यांच्यातील राजकीय फटकेबाजी पाहायला मिळाली होती. 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वैभव नाईक हे शिंदेंच्या बरोबर येणार होते, असा गौप्यस्फोट नीलेश राणे यांनी केला होता. ज्यानंतर राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली होती. तर या गौप्यस्फोटाची हवा काढत वैभव नाईक यांनी नीलेश राणेच पुढे भाजपसोबत जातील असा हल्लाबोल केला होता. यानंतर येथे राजकीय वर्तुळात थोडी शांतता होती.
पण महिन्या भराच्या अंतराने पुन्हा एकदा तळकोकणातील राजकीय वातावरण तापले असून वैभव नाईक आणि नीलेश राणे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. नीलेश राणे यांनी वैभव नाईकांचा नामोल्लेख टाळत त्यांची तुलना ‘शकुनी मामा’ शी केली आहे. तर असा ‘शकुनी आपल्या मतदारसंघात होता कामा नये’ असेही त्यांनी म्हटलं आहे.
नीलेश राणे, मागच्या 10 वर्षामध्ये कुडाळ मालवण मतदारसंघाची काय किंमत होती हे मंत्रालयामध्ये विचारा. 288 मतदारसंघात याला कोणी ओळखत नव्हतं. मी स्वतःचा मोठेपण सांगत नाही. पण राणे असल्याचा फायदा होतो. मी सत्तेच्या कुठल्या बाजूला आहे हे बघितलं नाही. जे खरं आहे ते बोललो. नाहीतर मंत्र्यासमोर असेच उभं राहिलं तर कोण किंमत देणारं आपल्याला? असं त्यांनी म्हटलं आहे.
वैभव नाईक यांच्यावर नाव न घेता टीका करताना त्यांना ‘शकुनी मामा’ची उपमा देत जोरदार टीका नीलेश राणे यांनी केली आहे. ते म्हणाले, शकूनींनी आपलं आयुष्य नकारात्मक घालवलं. प्रतिशोधाच्या भानगडीत तो होता. पण कधी त्याला समाधान मिळालं नाही. कौरवांचं वंश संपवलं. यामुळेच असे शकूनी आपल्या मतदारसंघामध्ये होता कामा नयेत.
आमचे पण दोन पराभव झाले, राणे साहेब दोन वेळा हरले. म्हणून आम्ही काही तो राग जनतेवर काढलेला नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या कुटुंबाचा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा संदर्भ देत विरोधकांवर टीका केली.
तसेच वैभव नाईक यांना पुन्हा डिवचत, काहीचं चांगलं होता कामा नये असा शकूनी करायचा. यामुळेच कधीच महाभारताच्या निकालावर परिणाम झाला नाही, पांडवचं जिंकले. दरम्यान आता नीलेश राणे यांनी केलेल्या या टीकेला वैभव नाईक काय बोलणार? कसे उत्तर देतात याकडे तळकोकणासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.