Nilesh Rane Won : कुडळा मतदारसंघात निलेश राणे यांनी वैभव नाईक यांचा पराभव करत विजय मिळवला. सिंधुदुर्ग मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मात्र, लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून नारायण राणे यांना मोठे लीड मिळाले होते. त्यामुळे नाईक हे कुडाळ मतदारसंघातून डेंजर झोनमध्ये होते.
युतीमध्ये कुडाळ मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे होता. हे 2019 मध्ये शिवसेनेकडून वैभव नाईक विजयी झाले होते. 2024 निवडणुकीसाठी भाजपमधून निलेश राणे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश धनुष्यबाण हाती घेतला.
कुडाळ मतदारसंघ 2009 मध्ये काँग्रेसकडून नारायण राणे यांनी विजय मिळवला होता. मात्र, 2014 च्या निवडणुकीत वैभव नाईक यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव नारायण राणेंच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे या पराभवाचा बदला घेण्यासाठी निलेश राणे यंदा निवडणुकीच्या मैदानात होते.
2019 मध्ये कुडाळ मतदारसंघातून वैभव नाईक यांना 69 हजार 168 मतं होती. तर, त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांना 54 हजार 819 मतं होती. 14 हजार 349 मतांनी वैभव नाईक विजयी झाले होते. तर, 2014 मध्ये वैभव नाईकांनी नारायण राणे यांचा तब्बल 10 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. तर, 2009 च्या निवडणुकीत राणेंनी वैभव नाईक यांचा 24 हजार मतांनी पराभव केला होता.
सिंधुदुर्गातील जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदारसंघात राणे विरुद्ध नाईक या लढाईकडे मराराष्ट्राचे लक्ष लागले होते. लोकसभेला या मतदारसंघातून नारायण राणेंना मोठे लीड मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणूक ही वैभव नाईकांना जड जाईल, असा चर्चा होत्या. शिवाय नारायण राणे हे देखील कुडाळमध्ये ठाण मांडून होते. त्यामुळे ही निवडणूक राणे आणि नाईक यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.