Savner Election Result : आशिष देशमुखांनी 30 वर्षांनी काढला वडिलांच्या पराभवाचा वचपा; केदारांच्या वर्चस्वाला हादरा

Ashish Deshmukh Sunil Kedar Anuja Kedar Mahayuti Mahavikas Aghadi : सुनील केदार आणि आशिष देशमुख यांच्यामध्ये यापूर्वीसुद्धा सावनेर मतदारसंघात घमासान झाले होते. मात्र त्यावेळी केदारांनी सामना जिंकला होता.
Savner Assembly Election
Savner Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Assembly Election : नागपूर जिल्ह्यातील दिग्गज नेते आणि महाविकास आघाडीला रामटेक लोकसभा मतदारसंघात एकहाती विजय मिळवून देणारे माजी मंत्री सुनील केदारांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना सावनेर विधानसभा मतदारसंघात आपल्याच पत्नीला निवडून आणता आले नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुजा केदार यांना भाजप महायुतीचे आशिष देशमुख यांनी समारे 20 हजार मतांच्या फरकांनी पराभवाचा धक्का दिला आहे.

विशेष म्हणजे आशिष देशमुख यांनी तब्बल 30 वर्षानंतर आपले वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्या पराभवाचा बदला घेतला आहे. केदार आणि देशमुख यांच्यामध्ये यापूर्वीसुद्धा सावनेर मतदारसंघात घमासान झाले होते. मात्र त्यावेळी केदारांनी सामना जिंकला होता.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

Savner Assembly Election
Nalaspora assembly Result : विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप असलेल्या मतदारसंघात धक्कादायक निकाल

केदारांना पराभूत करण्याचे भाजपने अनेक प्रयत्न केले. अमित शहा यांनासुद्धा प्रचारात बोलावले होते. मात्र भाजपला त्यांना हरवता आले नव्हते. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यात सुनील केदारांना न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांना निवडणूक यावेळी लढता आली नाही. त्यामुळे भाजपला चांगली संधी चालून आली होती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

भाजपने काटोलची तिकीट मागणाऱ्या आशिष देशमुखांना सावनेरमध्ये वेळेवर पाठवले. याचा फायदा केदारांना होईल असाच समज सर्वांचा होता. मात्र देशमुखांनी तो खोटा ठरवला. आशिष देशमुख यांनी 2014 च्या निवडणुकीत काटोलमध्ये जाऊन आपले काका अनिल देशमुख यांचासुद्धा धक्कादायक पराभव केला होता.

Savner Assembly Election
Ranajagjitsinha Patil Won : पराभवाच्या छायेतील राणा पाटलांनी विकासकामांच्या बळावर विजय खेचून आणला

नागपूर जिल्ह्यात सर्व सूत्रे केदारांनी आपल्या हाती घेतली होती. उमेदवारसुद्धा मीच ठरवणार, असे ते सांगत होते. रामटेकमध्ये काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांचा त्यांनी उघडपणे प्रचार केला होता. हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश बंग यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यास दबाव टाकला होता. त्यामुळे काँग्रेसचे सुद्धा केदारांच्या दादागिरीला कंटाळले होते. अनुजा केदार यांचा पराभव करून सर्वांनी केदारांना धडा शिकवला असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com