Raigad murder case : मंगेश काळोखे प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय, देवकर पिता-पुत्र अन् मेव्हण्यासह 9 संशयितांना दणका

Raigad Mangesh Kalokhe murder case : रायगड जिल्हा हादरवून टाकणाऱ्या मंगेश काळोखे यांची हत्या प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय घेतला असून देवकर पिता-पुत्र अन् मेव्हण्यासह 9 संशयितांना दणका दिला आहे.
Raigad Mangesh Kalokhe murder case
Raigad Mangesh Kalokhe murder casesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मंगेश काळोखे हत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली आहे.

  2. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश असून, पाच पोलीस पथकांनी तपास केला.

  3. खालापूर न्यायालयाने आरोपींना 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Raigad News : रायगड जिल्ह्यासह राज्याला शुक्रवारी हादरवून टाकणारी घटना घडली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी तथा नवनिर्वाचित नगरसेवक मानसी काळोखे यांचे पती तथा माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर जिल्ह्यात राजकीय वाद सुरू झाला. तर या घटनेनंतर परिसरात प्रचंड जनक्षोभ उसळला. ज्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यादरम्यान आता अवघ्या 24 तासांत पोलिसांनी काळोखे यांची हत्या करून फरार झालेल्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आज (दि.28) त्यांना खालापूर न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर, त्यांची पत्नी उर्मिला देवकर, दोन्ही मुले (दर्शन, धनेश) तसेच मेव्हण्यासह चार संशयित आरोपींना समावेश आहे. पण अद्याप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंसह भरत भगत फरार आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, खोपोली परिसरातील रहाटवडे येथील रहिवासी असणारे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगराध्यक्ष मंगेश काळोखे हे शुक्रवारी सकाळी खोपोली येथील शिशु मंदिर स्कुलमध्ये मुलीला सोडण्यासाठी गेले होते. ते पर येत असतानाच येथील विहार जया बार चौकात त्यांच्यावर काही हल्लेखोऱ्यांनी हल्ला केला. त्याच्यावर कोयता, तलवार व कुऱ्हाडीसह धारधार शस्त्रांनी तब्बल 27 वार करण्यात आले. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याची माहिती वाऱ्यासारखी खोपोलीत पसरल्यानंतर नागरीकांनी संताप व्यक्त केला. यावेळी मोठी गर्दीही झाली. यानंतर या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन देत जमावाला शांत केलं. यावेळी काळोखे यांचे पुतणे राज निलेश काळोखे यांनी पोलीसांत फिर्याद दिली.

Raigad Mangesh Kalokhe murder case
Raigad murder case : मंगेश काळोखेंची निर्घृण हत्या; कटाचा आरोप असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गुजरातमध्ये, व्हिडीओमधून म्हणाले...

ज्यात त्यांनी राजकीय वादातून ही हत्या झाल्याचा दावा करत निवडणुकीतील पराभव सहन न झाल्यानेच ही हत्या केल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी आपल्या फिर्यादीत मुख्य सूत्रधार रवींद्र देवकर, त्यांची पत्नी उर्मिला देवकर, दोन्ही मुले (दर्शन, धनेश) तसेच मेव्हण्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे व प्रवक्ते भरत भगत आणि रविंद्र देवकर याचा बाऊन्सर आणि अन्य 3 तिघांचे नाव घेतले.

या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. यावेळी पोलीस अधिक्षक आंचल दलाल व अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथक तयार करण्यात आली. वेगवेगळ्या मार्गाने शोध सुरू केला. या दरम्यान, मारेकऱ्यांनी मोबाईल फोन बंद करून ठेवल्याचे दिसून येत होते.

मात्र, ते मुंबई व अन्य ठिकाणी पळून गेल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपींच्या ठाव ठिकाणाची निश्चित माहिती नव्हती. पण टीप मिळताच पथकाने मारेकऱ्यांचा शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी रविंद्र देवकर, दर्शन देवकर, धनेश देवकर, उर्मिला देवकर, विशाल देशमुख, महेश धायतडक, सागर मोरे, सचिन खराडे, दिलीप पवार या नऊ जणांना अटक केली.

या सर्वांना पोलीस बंदोबस्तात रविवारी, (दि.28) सायंकाळी साडेचार वाजता खोपोली न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने या सर्वांना न्यायालयाने 5 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे अद्याप फरार असून भरत भगत यांचाही शोध घेतला जात आहे.

Raigad Mangesh Kalokhe murder case
Raigad murder case : 'सुनील तटकरे हे रायगडचे आका, मंगेश काळोखेंना राष्ट्रवादीने प्री-प्लॅनिंगने संपवलं...', शिवसेना आमदाराने सांगितल्या हत्येपूर्वीच्या भेटीगाठी

FAQs :

Q1. मंगेश काळोखे यांची हत्या कधी झाली?
👉 शुक्रवारी (26 डिसेंबर) सकाळी भर रस्त्यात ही हत्या झाली.

Q2. या प्रकरणात किती आरोपी अटकेत आहेत?
👉 आतापर्यंत एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Q3. अटक केलेल्यांमध्ये महिला आरोपी आहे का?
👉 होय, या प्रकरणात एका महिलेचा देखील समावेश आहे.

Q4. आरोपींना किती दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे?
👉 खालापूर न्यायालयाने 4 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Q5. तपास कोण करत आहे?
👉 स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह विविध पोलीस ठाण्यांची पाच पथके तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com