Uddhav Thackeray News : 'मी सूड घ्यायला आलो आहे', उद्धव ठाकरे कडाडले

Loksabha Election : आपल्यासोबत डब्बल गद्दारी झाली. यांनी तर गद्दारी केली मात्र माझ्या सांगण्यावरून मोदींना पंतप्रधान केलं म्हणून मी माफी मागतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Loksabha Election : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. शिंदे गटाचे धैर्यशील माने, शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी Raju Shetti यांना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजीत पाटील जोरदार टक्कर देत आहेत. सत्यजित पाटलांच्या प्रचारासाठी येथे उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेतली. शिवसेना भाजप एकत्र असताना शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्यासाठी भाजपने कशी सेटींग केली होती हे सांगत मी सूड घ्यायला आलो आहे, असे उद्धव ठाकरेंनी भाजपला ठणकावले.

Uddhav Thackeray
Maval Lok Sabha Constituency : भाजपचा मित्रपक्षांवर भरवसा नाय का? शिवसेना उमेदवार असलेल्या मावळात दिल्लीतून आले खास पथक!

'पाडापाडीचे धंदे केले. मी सूड घ्यायला आलो आहे. तुम्ही देखील सूड घेतला पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. तुम्ही तुमचं सगळं सोनं करून घेतलं असं तुम्हाला वाटलं पण हा सगळ्या महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय, असा टोल देखील ठाकरेंनी भाजपला BJP लगावला.

उद्धव ठाकरेंनी मागितली माफी

गेल्या वेळी मी त्यांच्याकडे मत मागयला होतो. तुम्ही त्याला निवडून दिलं मात्र येवढं धैर्य हरणारा माणूस मी पाहिला नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray धैर्यशील मानेंना नाव न घेता लगावला. आपल्यासोबत डब्बल गद्दारी झाली. यांनी तर गद्दारी केली मात्र माझ्या सांगण्यावरून मोदींना पंतप्रधान केलं.म्हणून मी माफी मागतोय. मोदींनी महाराष्ट्रासोबत द्रोह केला आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजप नालायक

हे फक्त खोकेबाज नाहीत. हे नालायक आहेत. संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाला कोणी जवळ घेत नव्हेत तेव्हा शिवसैनिकांनी, शिवसेनेने त्यांना खांद्यावर घेत महाराष्ट्रभर फिरवले. नरेंद्र मोदी हे शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत आहेत. सर्वोच्च न्यायालयात अजून हे प्रकरणाचा निर्णय झाला नाही. नकली शिवसेना म्हणत सर्वोच्च न्यायालयावर नरेंद्र मोदी दबाव आणत आहे.

Uddhav Thackeray
Satara News : "काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप होणार, बडा नेता भाजपात जाऊन राज्यपाल... ; आंबेडकरांचा स्फोटक दावा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com