Nitesh Rane : 'ट्विटर वॉर'नंतर पहिल्यांदाच नितेश राणेंचं भाष्य; म्हणाले, 'समझने वाले को इशारा...' निलेश राणेंचाही पलटवार

Nitesh Rane vs Nilesh Rane : महाराष्ट्राच्या राजकारणातील राणे बंधूंमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद असल्याची चर्चा सुरू आहे. नुकताच नितेश राणेंनी दिलेल्या स्वबळाच्या घोषणेनंतर निलेश राणेंनी देखील भाजपला अंगावर घेतले होते.
Nitesh Rane vs Nilesh Rane
Nitesh Rane vs Nilesh Ranesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. नितेश राणे यांनी निलेश राणेसोबत झालेल्या ट्विटर वॉरवर पहिल्यांदाच भाष्य करत “समझने वाले को इशाराही काफी है” असे वक्तव्य केले.

  2. निलेश राणेंनी यावर प्रत्युत्तर देत वाद टाळला आहे.

  3. या दोघांच्या वक्तव्यांमुळे राणे बंधूंमध्ये आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Sindhudurg News : आगामी स्थानिकच्या तोंडावर तळकोकणातील राणे कुटुंबात वाद सुरू झाल्याचे सध्या चित्र आहे. भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यात आपल्याच पक्षाचा झेंडा आगामी स्थानिकमध्ये फडकावण्याची आता स्पर्धा सुरू झाली आहे. याच दरम्यान नितेश राणे यांचे एक सूचक वक्तव्य समोर आले असून त्यांनी मध्यंतरी झालेल्या 'ट्विटर वॉर'वर प्रतिक्रिया दिली आहे. तर भावाबद्दल बोलताना समझने वाले को इशारा ही काफी है असे सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता या दोन्ही भावांमध्ये आलबेल नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.

नुकताच एका खासगी चॅनेलच्या कार्यक्रमात नितेश राणे यांनी पहिल्यांदाच निलेश राणे यांच्याबरोबर झालेल्या ट्विटर वॉरवर भाष्य केले. एकाच घरात राहत असतानाही निलेश राणे नितेश राणेंना ट्विटरवरूनच सल्ला देत असल्याने हा प्रश्न त्यांना करण्यात आला होता. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, आमच्यामध्ये सगळं आलबेल आहे.

पण मीडियाला काहीतरी बातमी दिली पाहिजे ना. त्यासाठी मग थोडं असं काहीतरी द्यावं लागतं. थोडं फार संघर्ष दाखवला तर लगेच त्याची हेडलाइन होते. चांगल्या कामाची बातमी होतेच असे नाही. पण अशा गोष्टींची लगेच बातमी होते.

Nitesh Rane vs Nilesh Rane
Nitesh Rane : तळकोकणात भाजप कार्यकर्त्यांच्या मनासारखं नितेश राणेंनी केलं; शिंदेंना दे धक्का देत केली स्वबळाची घोषणा? रंगली 'सिंधुदुर्ग पॅटर्न'ची चर्चा

यामुळेच आम्ही ठरवलं आहे की, जर आम्हाला चर्चेत राहायचं असेल तर भांडलं पाहिजे. एकीकडे दोन भाऊ एकत्र येत असताना बाकी भावांच्या पण बातम्या असाव्या ना. म्हणजे समझने वाले को इशाराही काफी है, असे म्हणत नितेश राणे यांनी सूचक वक्तव्य केलं.

तसेच त्यांनी, माणूस रागात काही तरी बोलून जातो, त्या बाजूला करायच्या असतात. तर त्या व्यक्तीने आपल्यासाठी शंभर गोष्टी केलेल्या आहेत. त्या मी विसरणारा नाही. माझ्याही भावाने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे.

यामुळे एका विधानामुळे असं सगळं बाजुला होत नाही. पण इतरांना दिसतं तसं चित्र आमच्या घरात नाही. ते आमचं आम्ही बघून घेवू. आमच्यात राग असेल तर तो निघूनही जाईल. सगळं ऑल इज वेल आहे. सगळं ठीक आहे आणि ठीकच राहणार असल्याचेही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

यानंतर आता दोन्ही बंधूंमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरून निलेश राणेंना विचारलं असता त्यांनी नितेश राणेंना मार्गदर्शन करणारं आपण कोण? असे बोलत जास्त बोलणं टाळलं आहे.

Nitesh Rane vs Nilesh Rane
Nitesh Rane : जातिवाचक नावे होणार इतिहासजमा! सिंधुदुर्गात नितेश राणेंनी दिला मोठा आदेश, 192 वस्त्या आणि 25 रस्त्यांची यादी तयार

FAQs :

1. नितेश आणि निलेश राणे यांच्यात ट्विटर वॉर का झाला?
दोघांच्या राजकीय मतभेदांमुळे आणि सूचक ट्वीट्समुळे वाद उफाळून आला.

2. नितेश राणेंनी काय वक्तव्य केलं?
त्यांनी “समझने वाले को इशाराही काफी है” असे म्हणत सूचक प्रतिक्रिया दिली.

3. निलेश राणेंनी यावर काय प्रतिक्रिया दिली?
निलेश राणेंनी “मी कोण मार्गदर्शन करणार?” असे म्हणत शांतपणे उत्तर दिले.

4. या घटनेचा राजकीय परिणाम काय झाला?
राजकीय वर्तुळात राणे बंधूंच्या नात्यात तणाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

5. दोघेही सध्या कोणत्या पक्षात आहेत?
नितेश राणे हे भाजपमध्ये असून निलेश राणे सुद्धा त्याच पक्षाशी संलग्न आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com