Eknath Shinde : ठाकरेंना कोकणात धक्का; लोकसभा लढलेल्या महिला नेत्याची शिंदेंना साथ

Uddhav Thackeray Shiv Sena Palghar Assembly Constituency Bharti Kamdi : भारती कामडी यांनी पालघरमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.
Bharti Kamdi, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Bharti Kamdi, Eknath Shinde, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांना कोकणात मोठा धक्का बसला आहे. पालघर लोकसभा मतदारसघाच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार भारती कामडी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्या पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत.

लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना कोकणात एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. आता विधानसभा निवडणुकीत ही कसर भरून काढण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, पालघरमध्ये त्यांना झटका बसला आहे. भारती कामडी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने पालघर विधानसभेचे गणित बदलले आहे.

Bharti Kamdi, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Raj Thackeray : मशि‍दीवरील भोंग्यांवर राज ठाकरे पुन्हा बरसले; म्हणाले, "मी तुम्हाला शब्द देतो…."

कामडी यांनी बुधवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. कामडी यांनी लोकसभा निवडणुकीत जवळपास चार लाखांहून अधिक मते मिळवली होती. शिवसेना फुटीनंतर कामडी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती.

दरम्यान, पालघर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राजेंद्र गावित मैदानात आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेने जयेंद्र दुबळा यांना रिंगणात उतरवले आहे. कामडी यांनी शिंदेंना साथ दिल्याने गावित यांचे पारडे जड झाले आहे.    

Bharti Kamdi, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Parag Shah : सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शाह प्रचारापासून काही दिवस राहणार अलिप्त; नेमकं काय घडलं

कोण आहेत भारती कामडी?

भारती कामडी या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संघटिका होत्या. 2020 मध्ये त्यांची पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून निवड जाली होती. सुमारे दीड वर्ष त्या या पदावर होत्या. लोकसभा निवडणुकीत त्यांनी चार लाखांहून अधिक मते मिळत महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा यांना टक्कर दिली होती. विधानसभा निवडणुकीसाठीही त्या इच्छुक होत्या. मात्र, त्यांना डावलण्यात आल्याने नाराज झाल्या होत्या.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com