Palghar Loksabha News : पालघरच्या जागेवर आमचाच हक्क; युती-आघाडीने पाठिंबा द्यावा : हितेंद्र ठाकूर

Mahayuti लोकसभेच्या निवडणूका जाहीर होऊन १३ ते १४ दिवस झाले आहेत. अद्यापही महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. अशीच काहीशी परिस्थिती पालघर लोकसभा मतदारसंघाची आहे.
Hitendra Thakur, Eknath Shinde, Devendra Fadanvis, Rajendra Gavit
Hitendra Thakur, Eknath Shinde, Devendra Fadanvis, Rajendra GavitSarkarnama

Palghar Loksabha News : महायुतीतील पालघर लोकसभेच्या जागेचा तिढा कायम असून खासदार राजेंद्र गावित यांच्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना आडून बसली आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी याच मतदारसंघावर हक्क सांगत निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. तसेच युती आणि आघाडीने आम्हाला पाठींबा द्यायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीपुढे आता ‘बहुजन’चे आव्हान असणार आहे. येत्या दोन दिवसांत आपण उमेदवार घोषित करू, असेही ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे पालघरमध्ये तिरंगी लढत होणार यावर शिक्का मोर्तब झाले आहे.

लोकसभेच्या निवडणूका जाहीर होऊन १३ ते १४ दिवस झाले आहेत. अद्यापही महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणचे उमेदवारही ठरलेले नाहीत. अशीच काहीशी परिस्थिती पालघर लोकसभा मतदारसंघाची आहे. या मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही आहे. विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यासाठी शिवसेनेचे नेते आडून बसले आहेत.

तर दुसरीकडे भाजपनेही या जागेवर दावा सांगितला असून, त्यांचे नेते ही जागा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे या मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आज बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पालघर मतदारसंघावर आमचाच हक्क असल्याचे सांगितले. त्यामुळे युती आणि आघाडीने आम्हाला पाठिंबा द्यायला हवा, असेही ते म्हणाले.

Hitendra Thakur, Eknath Shinde, Devendra Fadanvis, Rajendra Gavit
Palghar Loksabha News : एकनाथ शिंदेंचा खासदार ‘कमळा’वर लढणार? भाजप प्रवेशाचीही चर्चा...

या माध्यमातून हितेंद्र ठाकूर यांनी पालघरची निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, उमेदवाराचे नाव मात्र, त्यांनी गुलदस्तात ठेवल्याने कहानीतील व्टिस्ट बाकी राहिला आहे. याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, आतापर्यंत आम्ही राज्यसभा, विधान परिषद तसेच इतर ठिकाणी त्यांना पाठिंबा देत होतो. त्यामुळे आता त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. पालघर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून, त्यापैकी तीन मतदारसंघात आमचे उमेदवार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हा परिषदेत आमचा सभापती आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर आमचे वर्चस्व आहे. तसेच जल्ह्यातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेत ११५ नगसेवक आमचे आहेत. मतदारसंघातील ६० टक्के मते आमच्याकडे आहेत. त्यामुळे नैसर्गिक न्यायाने पालघरवर खरा हक्क आमचा आहे.

बहुजन विकास आघाडी पालघरमध्ये आपला उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा केल्याने महायुती आणि महाविकास आघाडीपुढे आता ‘बहुजन’चे आव्हान असणार आहे. येत्या दोन दिवसांत आपण उमेदवार घोषित करू, असे ही ठाकूर यांनी सांगितले. त्यामुळे पालघरमध्ये तिरंगी लढत होणार यावर शिक्का मोर्तब झाले आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Hitendra Thakur, Eknath Shinde, Devendra Fadanvis, Rajendra Gavit
Palghar Loksabha : पालघरमध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे Vs शिंदे गट असणार आमनेसामने ?, मात्र...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com