झेडपीच्या माजी सभापतींसह ११ जणांवर खंडणीचा गुन्हा

मोजणी करून वाद संपणार असेल म्हणून स्वखर्चाने जमिनीची मोजणी करण्यास कलाल तयार झाल्या होत्या.
Ransom case
Ransom case sarkarnama
Published on
Updated on

सफाळे : पालघर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती सुशील चुरी यांच्याविरोधात वाणगाव पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणू तालुक्यातील वणई गावातील जमिनीचा वाद मिटविण्यासाठी जमीनमालक महिलेला दमदाटी करीत पाच लाखांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चुरी यांच्यासह त्यांचे दोन अंगरक्षक आणि वणई गावाच्या माच्छी पाड्यातील ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Palghar ZP's Former agriculture chairman Sushil Churi has been charged Ransom case)

माच्छी पाड्यातील धनंजय गोपीनाथ दांडेकर, रसिका धनंजय दांडेकर यांच्या मालकीची १० एकर शेतजमीन निर्मला कलाल यांनी जून महिन्यात खरेदीखत करून विकत घेतली. १३ ऑगस्ट २०२१ रोजी सुकऱ्या गडग आणि इतर काहींनी जनावरे घुसवून शेतजमिनीची नासधूस केली. ४ सप्टेंबर २०२१ रोजी जमिनीच्या कुंपणाची दुरुस्ती आणि फलक लावण्याचे काम सुरू असताना काशिनाथ बसवत, लक्ष्मी गडग, रंजू गडग यांनी मजुरांना दमदाटी करीत कुंपण दुरुस्तीचे काम बंद पाडले. फलक पाडून टाकला. निर्मला कलाल यांना दमदाटी करून त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीतून हाकलून लावले होते. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी वाणगाव पोलिस ठाण्यात काशिनाथ बसवंत याने पोलिस ठाण्यात त्यांच्यासोबत आलेल्या माजी सभापती सुशील चुरी यांची निर्मला कलाल यांच्यासोबत ओळख करून देत जमिनीच्या वादासंदर्भात आमच्यातर्फे सुशील चुरी मध्यस्थी करणार असल्याचे सांगितले.

Ransom case
भाजपला अवघ्या तीन दिवसांत दुसरा मोठा धक्का!

सुशील चुरी यांनी जमिनीचा वाद मिटविण्यासाठी निर्मला कलाल यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती; परंतु कलाल यांनी पाच लाख रुपये देण्यास नकार दिल्याने सुशील चुरी यांनी आयुष्यात ही जमीन तुमची होऊ देणार नसल्याचे सांगत आदिवासींना जातिवाचक शिवीगाळ केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यास सांगेन, असे कलाल यांना धमकावले होते. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी सुशील चुरी यांनी जमिनीची शासकीय मोजणी आणि त्याचा खर्च निर्मला कलाल यांनी करावा, असा धमकीवजा प्रस्ताव दिला होता.

Ransom case
राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या आदिवासी नेत्याला जीवे मारण्याची धमकी

मोजणी करून वाद संपणार असेल म्हणून स्वखर्चाने जमिनीची मोजणी करण्यास कलाल तयार झाल्या होत्या. त्यानंतर डहाणू येथील भूमिअभिलेखकडे अर्ज करून पोलिस बंदोबस्तात ११ ऑक्टोबर २०२१ रोजी जमीन मोजणीची सुरू केली होती. जमिनीची मोजणी चालू असताना दुपारी सुशील चुरी आणि त्यांच्या साथीदारांनी शासकीय सर्वेअरला दमदाटी करीत मोजणी बंद पाडली. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही मोजणी झाली नाही. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी निर्मला कलाल यांना सुशील चुरी यांनी फोनवरून खोटा गुन्हा अजूनही दाखल करावयाला लावू शकतो, अशी धमकी देत ५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी निर्मला कलाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुशील चुरी आणि त्यांच्या साथीदारांविरोधात वाणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com