Shivsena UBT Crisis : उद्धव ठाकरेंनी भाकरी फिरवताच नाराजीचा स्फोट! कोकणात नव्या नियुक्त्यांमुळे शिवसैनिक आक्रमक

Panvel Uddhav Thackeray Shivsena UBT : नुकताच उद्धव ठाकरे यांनी पनवेलमध्ये पक्षात मोठे बदल केल्याने शिरीष घरत यांना जिल्हाप्रमुख पदावरून पायउतार व्हावे लागले होते.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. उद्धव ठाकरे यांनी पनवेलमध्ये शिवसेनेत मोठे संघटनात्मक फेरबदल केले आहेत.

  2. शिरीष घरत यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवून दीपक निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  3. समाधान काशीद यांना महानगरप्रमुखपद मिळाल्यानंतर घरत समर्थक नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Panvel Shivsena UBT News : नुकताच पनवेलमध्ये शिवसेनेत मोठ्या उलथा पालथी झाल्या असून दीपक निकम यांची जिल्हाप्रमुखपदी तर समाधान काशीद यांची थेट महानगरप्रमुखपदी वर्णी लागली आहे. यामुळे पक्षाशी निष्ठावंत राहिलेल्या शिरीष घरत यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. या नियुक्तीनंतर आता पनवेलमध्ये नाराजीचा उद्रेक पाहायला मिळत असून घरत समर्थक आक्रमक झाले आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षात भाकरी फिरवत नव्या नियुक्त्या केल्या. ज्यानंतर नवनियुक्त जिल्हाप्रमुख दिपक निकम यांनी मुंबईत 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी निकम यांचे अभिनंदन ठाकरे यांनी केले. तसेच पनवेलमध्ये पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या सूचना दिल्या. ही भेट पनवेलमधील शिवसेनेच्या नव्या संघटनात्मक रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

दरम्यान आता या नियुक्तीने घरत समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. तर ही नाराजी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत शिरीष घरत तसेच पूर्वाश्रमीचे महानगर प्रमुख अवचित राऊत यांना स्थान न देण्यावरून समोर येत आहे. तर पनवेलमध्ये पक्षासाठी कठीण काळात साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना डावलल्याने कमजोर असलेली उद्धवसेना आणखी कमजोर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर या नियुक्त्या पनवेल शिवसेनेत नेहमीच वर्चस्व राहिलेले बबन पाटील यांच्या हस्तक्षेपामुळेच झाल्याची चर्चा आहे.

Uddhav Thackeray
Shivsena UBT crisis : ठाकरेंना रामराम ठोकलेला शिलेदार कमळ हाती घेणार? भाजप नेत्यासोबत फोटो समोर आल्याने राजकीय उलथापालथ

दरम्यान आता पनवेल महापालिकेत नियुक्ती झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदावरून देखील आता खटके उडताना दिसत आहे. बबन पाटील यांनी आपले समर्थक नितीन गावंड यांची नियुक्ती केली असून यात देखील मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चा रंगली होती. अशातच आता नव्या नियुक्त्यांमुळे पुन्हा एकदा नवा वाद सुरू झाला आहे.

या नियुक्त्यांत बबन पाटील यांचे बंधू रामदास पाटील व खारघरमधील पक्षाचे नेते भरत पाटील यांना उपजिल्हा प्रमुख केल्याने या वादाला तोंड फुटले आहे. तर शिरीष घरत यांनी पक्षाची ताकद वाढवत पनवेल महापालिकेतही पक्षाची ताकद वाढली. एकही जागा नसलेल्या पालिकेत त्यांनी पक्षाच्या चिन्हावर पाच नगरसेवक निवडून आणले. पण नव्या नियुक्त्त्यामध्ये आपल्याला विश्वासात घेतले नाही, अशी खंत व्यक्त केलीय.

Uddhav Thackeray
Shivsena UBT Crisis : ठाकरेंच्या शिवसेनेत निकालाचा भूकंप! शहराध्यक्षांचा थेट राजीनामा

FAQs :

1. पनवेलमध्ये शिवसेनेत कोणते बदल करण्यात आले?

दीपक निकम यांची जिल्हाप्रमुखपदी आणि समाधान काशीद यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

2. शिरीष घरत यांच्याबाबत काय निर्णय झाला?

त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

3. या बदलांनंतर कोण नाराज असल्याची चर्चा आहे?

शिरीष घरत समर्थक नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

4. समाधान काशीद यांची पक्षात कोणत्या पदावर नियुक्ती झाली?

त्यांची थेट महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

5. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर काय चर्चा सुरू झाली?

पनवेलमधील शिवसेनेच्या नव्या राजकीय समीकरणांची आणि अंतर्गत नाराजीची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com