Parshuram Uparkar : काँग्रेसनंतर मनसेलाही खिंडार; 'हा' बडा नेता लवकरच सत्ताधारी पक्षात जाणार

Sindhudurg MNS : मनापासून काम करूनही निष्ठावंताना बाजूला सारण्याचे मनसेत काम सुरू
Sidhudurg, Raj Thackeray
Sidhudurg, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg Political News : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेतून हकालपट्टी करण्यात आलेले माजी आमदार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मेळाव्यात आपल्या पुढील राजकीय भूमिकेची सूतोवाच केल आहे. अलीकडेच मनसे नेते शिरीष सावंत यांनी एका पत्रकाद्वारे परशुराम उपरकर यांचा आता मनसेशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता उपरकरांनी भूमिका स्पष्ट केली. आपणच मनसेला सोडचिठ्ठी देणार होतो, असे म्हणत उपरकरांनी राज्यातील सत्ताधारी पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच केले. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा सिंधुदुर्गात आहे.

कुडाळ येथे माजी आमदार परशुराम उपरकर (Parshuram Uparkar) समर्थकांचा भव्य मेळावा रविवारी पार पडला. यावेळी शेकडो उपरकर समर्थक उपस्थित होते. यानंतर पत्रकार परिषदेत उपरकारांनी सत्ताधारी पक्षात सहभागी होणार असल्याचे विधान केले. तसेच याबाबत आपल्या बरोबरचे कार्यकर्ते कोणत्या सत्ताधारी पक्षात जायचे हे ठरवतील. पक्षप्रवेशाबाबत येत्या १५ दिवसांत निर्णय होईल, असेही उपकरांनी स्पष्ट केले.

Sidhudurg, Raj Thackeray
Riteish Deshmukh News : 'अमित भैया आता ती वेळ आली आहे, तुम्ही ते पाऊल उचललं पाहिजे'

माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) स्थापनेपासून आपण पक्षाचे काम केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळागाळापर्यंत तसेच आजच्या युवापिढीपर्यंत पक्षाची ध्येय आणि धोरणे पोहचवली. पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी झोकून काम केले. पक्षाकडून मात्र मागील काही वर्षांत आम्हाला पूर्णतः दुर्लक्षित ठेवण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एक-दोन वर्षांत पक्षांचे जे सक्रिय कार्यकर्ते होते, त्यांच्यावर केवळ द्वेषपोटी पक्ष निरीक्षकांनी कारवाई केली. निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी केले. पक्षात मनमानी कारभार सुरू असून ही आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे. त्यामुळे आम्ही सार्जनीक राजीनामे दिले आहेत. आता सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेत जाणार आहोत, असे उपरकरांनी यावेळी सांगितले.

Sidhudurg, Raj Thackeray
Ramdas Athawale : आम्ही युती केल्यापासून SC मतं भाजपला मिळू लागली; आठवलेंचा दावा...

कोणत्या पक्षात जाणार हे लवकरच ठरेल..

उपरकर म्हणाले की, राज्यात सत्तेत असलेल्या पक्षात आम्ही प्रवेश करू. परंतु, या संदर्भात माझे निष्ठावान कार्यकर्ते जे सांगतील त्या पक्षात प्रवेश होईल. जिल्ह्यातील लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेत जाऊन काम करणे आवश्यक आहे. येत्या १५ दिवसांत याबाबत निर्णय होईल.

आम्ही मनसेवर आता कोणतीही टीका करणार नाही. मनसेने जनतेची कामे करावीत आणि आपला पक्ष वाढवावा. मात्र, आता आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या येत आहेत. जे निरीक्षक येत आहेत त्यांनी आता आमच्यावर टीकाटिप्पणी करू नये. आम्ही तुमच्यासोबत फारकत घेतली आहे. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला दम भरल्यास माझे कार्यकर्ते समर्थ असतील, असा इशाराही उपरकांनी दिला.

यावेळी प्रसाद गावडे, विनोद सांडव, आशिष सुभेदार, बाबल गावडे, आपा मांजरेकर, मंदार नाईक, दीपक गावडे, आदेश सावंत, राजेश टंगसाळी, आबा चिपकर, प्रकाश साटेलकर, बाळकृष्ण ठाकूर, प्रतीक कुबल, संदीप लाड, अमोल जंगले, अभय देसाई, सत्यविजय कविटकर, सदाशिव गुरव, सुंदर गावडे, दत्ता गावडे, विजय जांभळे, गुरू मर्गज यासंह ५०० ते ६०० माजी पदाधिकारी व कार्यकर्ते निर्धार मेळाव्याला उपस्थित होते. आता हे सर्व सत्तेत सहभागी झाल्यानंतर मनसेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठे खिंडार पडणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sidhudurg, Raj Thackeray
Hemant Godse : व्हिडिओ व्हायरल तरी हेमंत गोडसेंनाच पसंती; नाशिकचा सर्व्हे काय सांगतो ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com