Shivsena leader murder case : शिवसेनेच्या मंगेश काळोखेंच्या निर्घृण हत्येत 8 आरोपी गजाआड; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंसह अन्य अजूनही फरार

Shivsena Leader Mangesh Kalokhes Murder case : खोपोली नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर शहरात गंभीर आणि धक्कादायक घटना घडली आहे.
Shivsena Leader Mangesh Kalokhes Murder case; Eknath Shinde
Shivsena Leader Mangesh Kalokhes Murder case; Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. खोपोली येथे शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या झाल्याने रायगड जिल्हा हादरला.

  2. पोलिसांनी मुख्य संशयित आरोपींसह एकूण 8 जणांना ताब्यात घेतले आहे.

  3. नगरपरिषद निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसांत ही घटना घडल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

Raigad News : कैलास म्हामले

खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर अवघ्या काही दिवसांतच शुक्रवारी (26 डिसेंबर) खोपोली शहरात घडलेली शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येची घटना संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरवून गेली आहे. दरम्यान शनिवारी (27 डिसेंबर) रोजी सकाळी नागोठणे येथून हत्येतील मुख्य संशयित आरोपी रविंद्र देवकर आणि दर्शन देवकर यांच्यासह अन्य 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खोपोली शहरातील रहाटवडे येथील शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश सदाशिव काळोखे (वय 45) यांची 26 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता मुलीला शाळेतून सोडून येताना विहारी परिसरात चारचाकी वाहनातून आलेल्या पाच हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर करून त्यांचा खुन केला.

मयत मंगेश काळोखे यांचे पुतणे राज निलेश काळोखे (वय २२) यांनी खोपोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, निवडणुकीतील पराभव सहन न झाल्याने ही हत्या झाल्याचा आरोप केला आहे. आरोपींमध्ये रविंद्र देवकर, दर्शन देवकर, धनेश देवकर, सचिन चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे व प्रवक्ते भरत भगत आणि रविंद्र देवकर याचा बाऊन्सर आणि अन्य 3 आरोपींचा कटात सहभाग असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Shivsena Leader Mangesh Kalokhes Murder case; Eknath Shinde
Raigad murder Case : मंगेश काळोखे हत्याप्रकरण; गोगावलेंनी हत्येचं कारण सांगताच, संशयित राष्ट्रवादीच्या घारेंचा खळबळजनक दावा करणारा व्हिडिओ समोर... (Video)

दिनांक 26 रोजी या हत्येनंतर जुन्या मुंबई–पुणे महामार्गालगत असलेल्या खोपोली पोलीस ठाण्याबाहेर मयत मंगेश काळोखे यांचे समर्थक व शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. संतप्त महिलांनी व कार्यकर्त्यांनी आक्रोश करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.

सर्व परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त केला. दिवसभर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली.संतप्त समर्थकांनी काही काळ मुंबई पुणे राज्य मार्ग सुद्धा अडवला होता.

दरम्यान, या घटनेनंतर शिवसेनेचे मंत्री भारत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे तसेच आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोली येथे भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. रायगडच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून तपासाला गती देण्याचे आदेश दिले आहेत. यामधील राजकीय नावे आल्यानंतर सुधाकर घारे यांनी सुद्धा या प्रकरणाशी आमचा संबंध नसल्याचे एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

Shivsena Leader Mangesh Kalokhes Murder case; Eknath Shinde
Khopoli murder case : शिवसेनेच्या शिलेदाराच्या हत्येनंतर शिंदे आक्रमक, केली मोठी घोषणा; म्हणाले, 'केस फास्ट ट्रॅक अन् गुन्हेगारांना फासावर...'

FAQs :

1. मंगेश काळोखे कोण होते?
ते खोपोलीतील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते.

2. हत्या कधी आणि कुठे झाली?
शुक्रवारी (26 डिसेंबर) खोपोली शहरात ही निर्घृण हत्या घडली.

3. या प्रकरणात किती आरोपी अटकेत आहेत?
आतापर्यंत 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

4. मुख्य संशयित कोण आहेत?
रविंद्र देवकर आणि दर्शन देवकर हे मुख्य संशयित आरोपी आहेत.

5. या घटनेचा राजकारणावर काय परिणाम झाला?
निवडणुकीनंतर लगेचच हत्या झाल्याने रायगडमध्ये तीव्र राजकीय तणाव निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com