BJP crisis : ठाकरेंना कोकणात डबल लॉटरी? राणेंसह महायुतीला मोठा झटका; भाजप ओबीसी शहराध्यक्षाचा जाहीर प्रवेश, जिल्हा उपाध्यक्षही वाटेवर

Shivsena UBT Vs MP Narayan Rane : रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून आतापर्यंत येथे महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडताना दिसत होते. पण आता येथे भाजपला मोठे खिंडार पडल्याचे समोर आले आहे.
Shivsena UBT Vs BJP; uddhav thackeray And MP Narayan Rane
Shivsena UBT Vs BJP; uddhav thackeray And MP Narayan Ranesarkarnama
Published on
Updated on
Summary

• जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ओबीसी शहराध्यक्षांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
• भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह उपाध्यक्षपदाचा तातडीने राजीनामा दिला आहे.
• या दोन्ही घडामोडींमुळे चिपळूणच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भोसले पुढे कोणत्या गटात सामील होतील याकडे सर्वांचे लक्ष आहे
.

Ratnagiri News : जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली असून अनेक ठिकाणी राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे जिल्ह्यातील महायुती अथवा महाविकास आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नसताना भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. अशावेळी भाजपला येथे मोठे खिंडार पडले आहे. भाजप जिल्हा उपाध्यक्षासह ओबीसी शहराध्यक्षाने एकाच वेळी भाजपला रामराम ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्यात भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणें यांचा निकटवर्तीय नेताही आहे. जो ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीसाठी देखील पडघम वाजू लागले आहेत. सध्या लांजा, खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड पाठोपाठ आता रत्नागिरी नगर पालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला आहे.

अशातच येथे भाजपमधील अंतर्गत संघर्ष वाढू लागला असून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी आणि नामी संधी चालून आलीय. आतापर्यंत भाजप, शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष करत मोठे खिंडार पाडले होते. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला खिंडार पाडण्यात मोठे यश मिळवले आहे.

Shivsena UBT Vs BJP; uddhav thackeray And MP Narayan Rane
Narayan Rane : नारायण राणेंसह भाजपची डोकेदुखी वाढणार? शिवसेनेनं रणनीती आखली; नुकताच प्रवेश केलेल्या नेत्यालाच दिली पक्षप्रवेशाची ऑफर

येथे भाजप ओबीसी शहराध्यक्ष अमित विलणकर यांनी आपल्या सोबत 150 कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी शहराध्यक्षाने सोडलेल्या साथीमुळे महायुतीला येथे मोठा फटका बसला आहे. तसेच या प्रवेशामुळे शिवसेनेच्या शहरातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली असून शिवसेनेच्या संघटनेत महत्त्वाची भर पडल्याचे शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार बाळ माने यांनी म्हटले आहे.

एकीकडे विलणकर यांनी भाजपची साथ सोडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असतानाच दुसरीकडे भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या कुटुंबीयांचे निकटवर्तीय असणारे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या अचानक घडलेल्या घडामोडीमुळे चिपळूणस जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

परिमल भोसले यांनी देखील विलणकर यांच्याप्रमाणेच आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. या सामूहिक निर्णयामुळे भाजपच्या स्थानिक संघटनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर राणेंसह भाजपला मोठा धक्का बसल्याची येथे चर्चा सुरू झाली असून भाजपच्या रणनीतीवर थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

परिमल भोसले पक्षातील सक्रिय, संघटनेशी जोडलेले आणि प्रभावी नेतृत्व मानले जात असून त्यांच्या या राजीनाम्याने भाजपच्या अंतर्गत समीकरणांवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर ते लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय अधिकृतरित्या जाहीर करणार असून ठाकरेंची शिवसेना किंवा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Shivsena UBT Vs BJP; uddhav thackeray And MP Narayan Rane
'Narayan Rane यांना पक्षापेक्षा पुत्र महत्वाचे' Vaibhav Naik यांचा राणेंवर आरोप।Nitesh,Nilesh Rane।

FAQs :

1) भाजप ओबीसी शहराध्यक्षांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?

त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

2) परिमल भोसले यांनी कोणत्या पदाचा राजीनामा दिला?

भोसले यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

3) या दोन्ही घडामोडी कोणत्या निवडणुकांपूर्वी झाल्या?

जिल्ह्यातील चार नगरपरिषद व तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी.

4) परिमल भोसले पुढे कोणत्या गटात जाण्याची शक्यता आहे?

ते ठाकरे गटात किंवा शिंदे गटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

5) चिपळूणच्या राजकारणावर याचा काय परिणाम होणार?

भाजपच्या स्थानिक संघटनेवर परिणाम होण्याची शक्यता असून विरोधी पक्षांना मजबूत स्थिती मिळू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com