राणेंचा महाविकास आघाडीला धक्का : जिल्हा बॅंकेच्या संचालकाचा भाजपत प्रवेश

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे संचालक प्रकाश गवस यांचा भाजपत प्रवेश
Prakash Gavas
Prakash Gavas Sarkarnama
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (Sindhudurg District Bank) अध्यक्ष सतीश सावंत यांचे कट्टर समर्थक आणि बॅंकेचे संचालक प्रकाश गवस यांनी आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गवस यांचा भाजप प्रवेश हा महाविकास आघाडीला धक्का मानला जात आहे. (Prakash Gavas Director Sindhudurg District Bank joins BJP)

प्रकाश गवस यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंकेवर दहा वर्षे संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची आशा होती. मात्र, त्यांना डावलण्यात आले होते. अस्तित्व दाखवून देण्यासाठी ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत जिल्हा बॅंकेसाठी दोडामार्ग विकास संस्था मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्जही भरला आहे. त्यांच्यासारखा ज्येष्ठ संचालक गळाला लागल्याने राणे यांच्या भाजपप्रणित पॅनेलला बळ मिळाले आहे.

Prakash Gavas
स्मशानभूमीच्या उद्‌घाटनाला बोलावले की मला धडकीच भरते : फडणवीसांनी सांगितला तो किस्सा!

आमदार नीतेश राणे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत गवस यांनी भाजपत प्रवेश केला. यावेळी ज्येष्ठ नेते अतुल काळसेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा परिषदेतील गटनेते रणजित देसाई, माजी सभापती प्रमोद कामत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Prakash Gavas
राष्ट्रवादीचं ठरलं नाईक होणार अध्यक्ष; विश्वजित कदम ठरवणार काँग्रेसचा उपाध्यक्ष!

भाजप प्रवेशानंतर प्रकाश गवस म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकचा संचालक या नात्याने सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीने या वेळी माझा विचार उमेदवारी केला नाही, त्यामुळे मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. पण, शेवटी आमदार नीतेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या माध्यमातून भाजपप्रणीत पॅनेलमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा स्वगृही आल्याचा आनंद आहे.

Prakash Gavas
आता काय करायचे..? शिवसेना-राष्ट्रवादीपुढे पेच!

नीतेश राणे म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेत यापूर्वी निवडून आलेले पॅनेल हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून निवडून आलेले होते. आताही निवडून येणारे पॅनेलसुद्धा पुन्हा राणे यांचेच असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com