Pratap Sarnaik Post : 'रत्नजडित मोबाईलची ती भेट.., फोन केला तर दादा बोलतील असंच वाटतं'; अजित पवारांच्या आठवणीत प्रताप सरनाईक भावुक

Pratap Sarnaik recalls his emotional bond with late Ajit Pawar : अजित पवारांच्या जयंतीनिमित्त शिवसेना नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. तीन दशकांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला आहे.
Pratap Sarnaik Post
Pratap Sarnaik PostSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Birth Anniversary : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशभरातील विविध राजकीय नेत्यांकडून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत अजित पवार यांच्याशी असलेल्या सहवासाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) मंत्री सरनाईक यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "ही पोस्ट लिहिताना हात थरथरतोय आणि मन भरून येत आहे. आजही मनाच्या एका कोपऱ्यात असं वाटतं की दादा कुठेतरी आहेत. फोन केला तर बोलतील, भेटायला गेलो तर नेहमीप्रमाणे हसत स्वागत करतील. मात्र वास्तव वेगळं आहे."

त्यांनी गेली तीन ते साडेतीन दशके अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबतचा प्रवास हा केवळ राजकीय नसून कौटुंबिक नात्यासारखा असल्याचे नमूद केले आहे. विद्यार्थी संघटनेतील कार्यकर्ता म्हणून सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्यानंतर त्यांचा सहवास लाभला आणि त्यांनी केवळ राजकीय मार्गदर्शनच नव्हे, तर माणूस म्हणून घडवले, असेही सरनाईक यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Pratap Sarnaik Post
Shiv Sena UBT petition : फुटलेल्या सहा खासदारांना 'सर्वोच्च' नोटीस; उद्धव ठाकरेंच्या याचिकेची दखल, लोकसभा अध्यक्षांसह एकनाथ शिंदेंनाही उत्तर द्यावे लागणार

बारामतीतील दौरे, विविध भेटी आणि कामकाजाच्या अनुभवांचा उल्लेख करत त्यांनी अजित पवार यांच्याकडून कामातील शिस्त, स्वच्छतेची सवय, प्रशासनातील बारकावे आणि माणसे जोडण्याची कला शिकल्याचे सांगितले आहे. नाती कशी जपायची हे त्यांनी कृतीतून शिकवले, असेही त्यांनी नमूद केले.

Pratap Sarnaik Post
Maharashtra Bandh : दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा महाराष्ट्रात पडसाद; प्रकाश आंबेडकरांनी दिली महाराष्ट्र बंदची हाक

प्रतापला मदत करायचीय

पोस्टमध्ये सरनाईक यांनी "प्रतापला मदत करायचीय" हे अजित पवार यांचे वाक्य आजही कानात घुमत असल्याचे म्हटले आहे. त्या शब्दांमधून मिळणारे प्रेम, विश्वास आणि पाठबळ आयुष्यातील अनेक संघर्षांमध्ये बळ देत राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सिद्धिविनायक मंदिरातील भेट

जुलै 2008 मध्ये सिद्धिविनायक मंदिरात अजित पवार यांना रत्नजडित मोबाईल भेट दिल्याच्या प्रसंगाचाही त्यांनी उल्लेख केला. ही घटना अनेकांसाठी बातमी असली तरी स्वतःसाठी ती आदर आणि जिव्हाळ्याची भावना व्यक्त करणारा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जिवाभावाच्या माणसाचा विरह

पोस्टच्या शेवटी सरनाईक यांनी, "तुमचे जाणे हा फक्त महाराष्ट्राच्या राजकारणाचा तोटा नव्हता; तो माझ्यासाठी एका आधारवडाचा, मार्गदर्शकाचा आणि जिवाभावाच्या माणसाचा विरह होता," अशा शब्दांत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com