Shiv Sena UBT petition : फुटलेल्या सहा खासदारांना 'सर्वोच्च' नोटीस; उद्धव ठाकरेंच्या याचिकेची दखल, लोकसभा अध्यक्षांसह एकनाथ शिंदेंनाही उत्तर द्यावे लागणार

Supreme Court seeks replies on Shiv Sena UBT plea against merger of six MPs with Eknath Shinde-led Shiv Sena : सहा खासदारांच्या विलीनीकरणाला दिलेल्या मान्यतेवर सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; ओम बिर्ला, लोकसभा सचिवालय आणि एकनाथ शिंदे शिवसेनेला दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश
Shiv Sena UBT petition
Shiv Sena UBT petitionSarkarnama
Published on
Updated on

Supreme Court Shiv Sena UBT Petition : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दाखल केलेल्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, लोकसभा सचिवालयाचे सचिव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन झालेल्या सहा खासदारांना नोटीस बजावली आहे.

संबंधित पक्षांनी आपले उत्तर सादर करावे, असे निर्देश देत न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर निश्चित केली आहे.

ही याचिका लोकसभा अध्यक्षांनी फुटलेल्या सहा खासदारांच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेतील विलीनीकरणाला दिलेल्या मान्यतेविरोधात दाखल करण्यात आली आहे. अलीकडेच अध्यक्षांनी या विलीनीकरणाला मंजुरी दिल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

यापूर्वी या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती शिवसेना ठाकरे पक्षातर्फे (Shivsena UBT) ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी केली होती. मात्र त्यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने कोणतेही तत्काळ आदेश दिले नव्हते.

Shiv Sena UBT petition
FIR Against Protesters : 'UAPA-NSAचीही भीती नाही', 20 जुलै तर फक्त ट्रेलर होता; आशुतोष रांकांचा सरकारला झोंबणारा इशारा, 'लाखो 'झुरळं' पुन्हा दिल्लीत येणार'

सुनावणीदरम्यान वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयाला सांगितले की, शिवसेनेच्या दोन्ही गटांतील वाद आधीपासून न्यायालयात प्रलंबित असताना लोकसभा अध्यक्षांनी सहा खासदारांच्या विलीनीकरणाला मान्यता दिली. या निर्णयामुळे संसदेत शिवसेना UBT पक्षाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला.

Shiv Sena UBT petition
Balasaheb Thackeray controversy : बाळासाहेबांच्या वक्तव्याची शिंदेंसमोर खिल्ली; ठाकरेंच्या शिलेदाराच्या संतापाचा स्फोट, म्हणाला, ‘हे तर अमित शाहांचे सैनिक..!’

शिंदे शिवसेनेचे संख्याबळ वाढलं

शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदारांनी अलीकडील काळात शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. यात संजय देशमुख (यवतमाळ), संजय जाधव (परभणी), संजय दिना पाटील (मुंबई उत्तर पूर्व), नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), ओमप्रकाश राजेनिंबाळकर (धाराशिव) आणि भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) यांचा समावेश आहे. या विलीनीकरणानंतर लोकसभेतील एकनाथ शिंदे शिवसेनेची खासदारसंख्या 7 वरून 13 झाली आहे. तर शिवसेना ठाकरे पक्षाची संख्या तीन खासदारांवर आली आहे.

शिवसेना ठाकरे सेना पक्षाचा मोठा दावा

शिवसेना ठाकरे सेना पक्षाचा दावा आहे की, पक्षाच्या 'मशाल' चिन्हावर निवडून आलेले खासदार किंवा त्यांचा गट पक्षाच्या परवानगीशिवाय दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकत नाही. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी दिलेली मान्यता कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही, असा पक्षाचा युक्तिवाद आहे.

पुढची सुनावणी दोन आठवड्यानंतर

सर्वोच्च न्यायालयाने आता लोकसभा अध्यक्ष, लोकसभा सचिवालयाचे सचिव आणि एकनाथ शिंदे शिवसेनेत विलीन झालेल्या सहा खासदारांना नोटीस बजावत उत्तर मागवले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com