Rahul Narwekar News : मुंबईत पाऊल ठेवताच विधानसभा अध्यक्षांचं आमदार अपात्रतेप्रकरणी सूचक विधान; म्हणाले...

MLA Disqualification Hearing : " माझ्यावरती दबावतंत्र टाकून काम..."
Rahul Narwekar
Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर एकाच वेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवतानाच त्यांना खडे बोलही सुनावले होते. त्यामुळे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

अशातच नार्वेकर हे रविवारी अचानक दिल्लीला गेले होते. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे चर्चांना उधाण आले होते, पण आता दिल्लीहून मुंबईत परतताच विधानसभा अध्यक्षांनी सूचक विधान केलं आहे.

Rahul Narwekar
Indurikar Maharaj Big News : मराठा आरक्षणावरून वातावरण पेटलं; इंदुरीकर महाराजांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narwekar) हे रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले. त्यांनी मीडियाशी संवाद साधला. नार्वेकर म्हणाले, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. उद्याची हेअरिंग अपेक्षित आहेत. तुषार मेहता यांच्याशी चर्चा केलेली आहे. न्यायालयाची बाजू लक्षात घेत उद्या योग्य ती भूमिका तुषार मेहता मांडतील.

कोर्टाने जी अपेक्षा व्यक्त केली आहे त्याने कोर्टाची जी भूमिका आहे. त्याच्याशी सुसंगत अशी भूमिका न्यायालयात मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.अद्याप माझ्यापर्यंत कोणाचाही राजीनामा आलेला नसल्याचेही ते म्हणाले.

सरकार हे जनहितासाठी काम करत असतं. सरकार काम करत असतं, तेव्हा ते शाश्वत निर्णय घेणं गरजेचं असते. राज्यातील सरकार हे संवेदनशील असून, ते शाश्वत असे निर्णय घेण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे आणि ते करतील, असे मत नार्वेकर म्हणाले.

" माझ्यावरती दबावतंत्र टाकून काम..."

नार्वेकर म्हणाले, आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तरतूद आहे. त्या सर्व स्पेअरमध्ये राहून जर कोणी आपली बाजू मांडत असेल, तर ती त्यांची वैयक्तिक इच्छा आणि मर्जी आहे. माझ्यावर केला जाणाऱ्या टीका या हेतू पुरस्कृत आहेत. माझ्यावरती दबावतंत्र टाकून काम करून घेण्याचा प्रयत्न आहे. परंतु, यापूर्वीदेखील सांगितलेले आहे, या दबावतंत्राला कुठल्याही प्रकारचा भाव देत नाही व त्या टिप्पणींकडे लक्ष देत नाही.

विधिमंडळाच्या कायद्यावर ते दबावतंत्र टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या टीकांकडे मी लक्ष देत नाही. आंदोलनकर्त्यांनी आत्महत्या करू नये. सरकारवर विश्वास ठेवावं. सरकार योग्यरित्या न्याय देईल, असेही नार्वेकरांनी सांगितले.(Maratha Reservation)

Rahul Narwekar
Maratha Reservation News : बुरुडगाव ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय; सरपंच, उपसरपंचासह सर्व सदस्यांचा सामूहिक राजीनामा

राहुल नार्वेकर काय म्हणाले...?

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) सुनावणी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेऊन चर्चा केली. सुमारे पाऊण तास ही चर्चा झाली. मेहता यांच्याकडून जो कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे, तो घेतला आहे. न्यायालयात आम्ही योग्य ती भूमिका मांडू, असे नार्वेकर म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Rahul Narwekar
MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी; नार्वेकर सुधारित वेळापत्रक देणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com