Thackeray Group : आदित्य ठाकरे मथुरा दौऱ्यावर जाणार, काय आहे कारण?

Aaditya Thackeray to Visit Mathura : आदित्य ठाकरे हे मथुरा दौरा करणार आहेत. या दौऱ्यामागे काही विशेष कारण असल्याचे सांगण्यात येत आहे...
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama

Maharashtra Politics Latest News : शिवसेना (उबाठा गट) नेते आदित्य ठाकरे हे येत्या सोमवारी म्हणजे २७ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेला मथुरा दौऱ्यावर जाणार आहेत. मथुरेतील प्रसिद्ध आणि जीर्णोद्धार झालेल्या पाच शतकांपूर्वीच्या ठाकूर श्यामा श्याम मंदिराचे ते लोकार्पण करणार आहेत. पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. मंदिरांचे शहर असलेल्या मथुरेत आदित्य ठाकरे हे श्रीकृष्णाचे जन्मस्थळ आणि बांके बिहारी मंदिरातही दर्शन घेणार आहेत. शहरातील काही महत्त्वाच्या मंदिरातही आदित्य ठाकरे दर्शनासाठी जाणार आहेत.

Aaditya Thackeray
Shivsena-Bjp Alliance : भाजपसोबत पुन्हा युती करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न; भाजप आमदाराचा गौप्यस्फोट

ठाकूर श्यामा श्याम मंदिर हे मथुरेत यमुना नदीच्या काठावरील श्याम घाटवर आहे. हे मंदिर 500 वर्षे पुरातन आहे. हे मंदिर अतिशय जीर्ण आणि दुरवस्थेत होते. मंदिर दुरुस्तीसाठी सीएसआरद्वारे निधी उभारण्याचा प्रयत्न केला गेला, पण हा निधी मंदिरांसाठी उपयोगात आणण्याबाबत बंदी घातली गेली, असे चतुर्वेदी म्हणाल्या. कित्येक प्रयत्नानंतर आम्हाला मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एन. आर. अल्लुरी यांच्या नागार्जुन फाउंडेशनचे समर्थन मिळाले. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत करत मी ही छोटेसे योगदान दिले आहे, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. ( Aaditya Thackeray News )

श्री चीत स्वामीजींनी हे मंदिर बांधले होते. आता या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे. हा अभिमान आणि आनंदाचा क्षण आहे. मथुरा हे पवित्र शहर आहे. सांस्कृतिक आणि ( Shiv sena Thackeray Group News )ऐतिहासिक भूमिका बजावत राहील, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले. एकीकडे भाजपकडून उत्तर प्रदेशात अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी तयारी सुरू आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरे हे मथुराचा दौरा करत आहेत. यामुळे आदित्य ठाकरे यांचा हा दौरा चर्चेत आला आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray News : राणेंच्या कोकणात आदित्य ठाकरे काय नवीन बॉम्ब टाकणार? दोन दिवसांचा दौरा चर्चेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com