Raigad Lok Sabha Constituency : अनंत गीतेंना रायगडमधून पुन्हा लोकसभेत जाण्याची संधी!

Raigad Anant Gite profile in Marathi : पुन्हा एकदा अनंत गीते आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज...
Raigad Lok Sabha Constituency : अनंत गीतेंना रायगडमधून पुन्हा लोकसभेत जाण्याची संधी!
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते हे सलग सहा वेळा खासदार म्हणून निवडून आलेले शिवसेनेचे (ठाकरे गट) ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी रत्‍नागिरी आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून गीते यांची शिवसेनेत ओळख आहे. गीते यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, खासदार ते केंद्रीयमंत्री असा राजकीय प्रवास केला आहे. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ते आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. Raigad Anant Gite profile in Marathi

रायगड हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. गीते यांनी 2009 ते 2019 या असे दहा वर्षे रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान, 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ते अवजड उद्योगमंत्री होते. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी सुनील तटकरे यांचा निसटता पराभव केला होता. मात्र पुढे 2019 ला तटकरे यांनी आपल्या पराभवाचा वचपा काढलाच. या निवडणुकीत गीते यांना 30,000 मतांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते. LokSabha Election 2024

Raigad Lok Sabha Constituency : अनंत गीतेंना रायगडमधून पुन्हा लोकसभेत जाण्याची संधी!
Konkan Politics : ‘रायगड’वरून मंत्री चव्हाणांनी महायुतीत वात पेटवली; धैर्यशील पाटलांचे नाव आणले चर्चेत

दरम्यान, आता शिवसेनाफुटीनंतर ठाकरे गटाने रायगड लोकसभा मतदारसंघातून गीते यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे. सध्या ठाकरे गट हा महाविकास आघाडीचा प्रमुख घटकपक्ष आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार की ठाकरे गटाच्या वाट्याला, हे अद्याप निश्चित नाही. मात्र सध्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार तटकरे हे महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवार गटात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून हा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. तसेच, ठाकरे गटानेही जागावाटप होण्यापूर्वीच अनंत गीते यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे गीते यांनीदेखील तयारीला सुरुवात केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला ही जागा सुटल्यास गीते यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शेकापचे पाठबळ मिळू शकते. याशिवाय मतदारसंघातील तटकरे यांच्या घराणेशाहीवरून मतदारांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनाफुटीनंतर जनतेमध्ये जी सहानुभूती निर्माण झाली आहे, ती अनंत गीते यांच्या पथ्थ्यावर पडू शकते, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

Raigad Lok Sabha Constituency : अनंत गीतेंना रायगडमधून पुन्हा लोकसभेत जाण्याची संधी!
Raigad Lok Sabha Constituency : रायगडमध्ये तटकरेंच्या विरोधात 'मविआ'चा उमेदवार ठरला ! अनंत गीते मैदानात ?

नाव (Name)

अनंत गंगाराम गीते

जन्मतारीख (Birth date)

2 जून 1951

शिक्षण (Education)

दहावी

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

अनंत गीते यांचा जन्म रत्नागिरीतील तिसगी या गावात झाला. गीते हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गीते यांच्या वडिलांचे नाव गंगाराम आणि मातोश्रींचे नाव हे आनंदीबाई असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव आश्विनी.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

व्यवसाय

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

रायगड

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

शिवसेना (ठाकरे गट)

Raigad Lok Sabha Constituency : अनंत गीतेंना रायगडमधून पुन्हा लोकसभेत जाण्याची संधी!
नाराज नेते शिवसेनेला कुठे घेऊन जाणार...? जाधव, गीते, किर्तीकर आणि आता सावंत!

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

अनंत गीते हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत दाखल झाले. त्यांचा राजकारणातील प्रवास हा मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून सुरू झाला. 1985 ते 1992 ते मुंबई महापालिकेचे नगरसवेक राहिले. यातील दोन वर्षे त्यांनी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवले होते. पुढे 1996 मध्ये त्यांना खासदारकीची संधी मिळाली. अकराव्या लोकसभेत ते रत्नागिरी मतदारसंघातून पहिल्यादा संसदेत खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर सलग 1998, 1999, 2004 मध्ये ते खासदार म्हणून विजयी झाले.

दरम्यान, 2004 मध्ये राज्यमंत्री पुढे ऊर्जामंत्री म्हणूनही काम पाहिले. 2009 मध्ये 15 व्या लोकसभा निवडणुकीतही ते पाचव्यांदा विजयी झाले. यावेळी ते मतदारसंघ पुनर्रचनेत रायगड या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यानंतर पुन्हा 2014 च्या निवडणुकीत ते सहाव्यांदा खासदार म्हणून निवडून आले. यावेळी मात्र त्यांचा अगदी थोडक्या मतांनी विजय झाला होता. शिवेसना-भाजप युती सरकारमध्ये त्यांना अवजड उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला होता. पुढे 2019 च्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत गीते यांना 4,55,530 मते मिळाली होती, तर सुनील तटकरे हे 4,86,968मते घेऊन विजयी झाले होते.

Raigad Lok Sabha Constituency : अनंत गीतेंना रायगडमधून पुन्हा लोकसभेत जाण्याची संधी!
सुनील तटकरे दाखल घ्यायच्या लायकीचे नाहीत : अनंत गीते 

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

अनंत गीते यांनी सहा टर्म लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. या काळात त्यांनी आपल्या खासदार निधीतून मतदारसंघात विविध विकासकामे केली आहेत. यामध्ये रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या मतदारसंघातील गाव-पाड्यांना रस्त्यांना जोडण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता. त्याचबरोबर सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेवेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात दिला होता. मतदारसंघातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक साह्य असे विविध उपक्रम राबवित असल्याचे सातत्याने दिसून येतात.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

अनंत गीते यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी त्यांचा पराभव केला होता.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

या निवडणुकीत गीते यांच्या पराभवामागे तत्कालीन परिस्थितीत मतदारसंघातील बदललेली राजकीय समीकरणे होती. शेकापने राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर काँग्रेसनेही आघाडीचा धर्म पाळत तटकरे यांच्या मागे मोठी ताकद उभी केली होती. त्याचा फायदा तटकरे यांना झाला आणि गीते पराभूत झाले होते. याशिवाय शिवसेना -भाजप युतीमध्ये केंद्रात मंत्री म्हणून कार्यरत असताना गीते यांना मतदारसंघात कोणतेही प्रभावी विकासकाम करता आले नव्हते. अवजड उद्योग मंत्रालयाचे मंत्री असताना रोजगारनिर्मितीच्यादृष्टीने मतदारसंघात उद्योग वाढवण्यात त्यांना अपयश आले होते. त्यातच उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीयांना प्राधान्य दिले जात असल्याची खदखद स्थानिकांमध्ये होती आणि विरोधकांनी त्याच मुद्यावर प्रचाराच्या तोफा वाजवल्या होत्या. याचाही फटका त्यांना बसला होता. याशिवाय दक्षिण रायगडमध्ये जिल्हाप्रमुखपदाच्या निवडीवरून झालेल्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचाही गीते यांना फटका बसला होता.

Raigad Lok Sabha Constituency : अनंत गीतेंना रायगडमधून पुन्हा लोकसभेत जाण्याची संधी!
Anant Geete News : अनंत गीतेंचे होणार पुनर्वसन; मुंबईतून लोकसभेची उमेदवारी? : रायगड राष्ट्रवादीकडेच!

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

अनंत गीते हे सहा वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यातच रायगड, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांत शिवसेनेचा प्रभाव होता. त्यामुळे गीते यांचा जनसंपर्कही तितकाच प्रभावी आहे. सहा टर्म खासदार राहिलेल्या गीते यांचा संपूर्ण मतदारसंघात प्रभाव आहे. खासदार, मंत्री म्हणून राजकारणात सक्रिय असताना त्यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले होते. त्यामुळे खेडोपाड्यापर्यंत गीते यांचा संपर्क प्रभावी राहिला आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

अनंत गीते हे सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करताना दिसून येतात. त्यांच्या फेसबुक पेजवरून ते नेहमीच पक्षीय कामकाजाची माहिती, त्याचसोबत मतदारसंघातील दौरे, बैठका, गाठीभेटी, विकासाचे मुद्दे याबाबतची माहिती शेअर करताना दिसून येतात. सध्या सोशल मीडियावर ते फक्त फेसबुकवरच सक्रिय असल्याचे दिसून येते.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

अनंत गीते हे शांत, संयमी आणि स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सहा वेळा खासदार आणि केंद्रीयमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांच्या या राजकीय प्रवासात त्यांनी काही महत्त्वाची विधानेही केली आहेत. त्यातील काही विधानांमुळे ते वादग्रस्त ठरले होते. त्यापैकी त्यांनी महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून अस्तित्वात आला होता. त्यामुळे आपले राजकीय गुरू हे शरद पवार कधीच होऊ शकत नाहीत, आपले गुरू फक्त बाळासाहेब ठाकरेच असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावरून शिवसेनेने बोटचेपी भूमिका घेतली होती, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गीते यांच्यावर आगपाखड केली होती.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

बाळासाहेब ठाकरे

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

शांत, संयमी आणि स्वच्छ प्रतिमेचा राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गीते यांना प्रशासन आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील कामकाजाचा मोठा अनुभव आहे. शिवसेनाफुटीनंतर गीते यांनी ठाकरे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने शिवसैनिकांमध्ये असलेल्या सहानुभूतीचा त्यांना आगामी निवडणुकीत फायदा होऊ शकतो. याशिवाय आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीचाही गीते यांना उमेदवारी मिळाल्यास फायदा होऊ शकतो. गतनिवडणुकीत काँग्रेस-शेकापची युती होती. मात्र यावेळी राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत आणि तटकरे हे अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जागावाटपात हा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटल्यास अनंत गीते यांना शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या ताकदीचा फायदा होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

2019 मध्ये झालेल्या पराभवानंतर अनंत गीते राजकारणापासून थोडे अलिप्त असल्याचे दिसून येत होते. मतदारसंघातील कार्यक्रमांमध्येही त्यांचा अत्यल्प सहभाग दिसून येत होता. त्यामुळे मतदारसंघात ते सक्रिय नसल्याचा सूर आहे. सध्या शिवसेनाफुटीनंतर शिवसेनेच्या पारंपरिक मतांचे विभाजन झाल्यास त्याचा फटका अनंत गीते यांना बसू शकतो. गेल्या निवडणुकीत भाजपची मते गीते यांना मिळाली होती. ती मते यावेळी वजा होणार आहेत. याव्यतिरिक्त महाविकास आघाडीकडून अद्याप जागावाटप निश्चित झालेले नाही. रायगड मतदारसंघ गेल्यावेळी शिवसेनेकडे होता. तसाच राष्ट्रवादीकडेही होता. त्यावेळी राष्ट्रवादीचा खासदार या ठिकाणी विजयी झाला होता. जर जागावाटप करताना गतनिवडणुकीत ज्याचा उमेदवार विजयी झाला, त्याची ही जागा असा फॉर्म्युला ठरल्यास या ठिकाणी अनंत गीते यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधांतरी राहू शकते.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून जागावाटपावर अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु ठाकरे गटाने अनंत गीते हेच रायगड मतदारसंघाचे उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे. शेकापनेदेखील त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे चर्चेअंती राष्ट्रवादीदेखील शिवसेना ठाकरे गटाला रायगड मतदारसंघ सोडू शकते, असे कयास लावले जात आहेत.

जागावाटपाचा तिढा निर्माण होऊन गीते यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांना पक्ष जो निर्णय देईल तो मान्य करावा लागेल. मध्यंतरी बॅ. ए. आर. अंतुले यांच्या कन्येला राष्ट्रवादी उमेदवारी देऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, त्यावर राष्ट्रवादीकडून तशी अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतरच अनंत गीते किंवा ठाकरे गट कोणती भूमिका घेणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या मतदारसंघात आगामी निवडणुकीत विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यासाठीदेखील उमेदवारी मिळवण्याचे आव्हान असल्याचे मानले जात आहे. भाजपकडून धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. खासदार तटकरे हेदेखील इच्छुक नसल्याचेही बोलले जात आहे. त्यांच्याऐवजी आदिती तटकरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com